यवतमाळ: पोलीस अधीक्षकांचा दातृत्वपणा; 10 अनाथ बालकांच्या नावे प्रत्येकी दहा हजार
यवतमाळ: पोलीस अधीक्षकांचा दातृत्वपणा; 10 अनाथ बालकांच्या नावे प्रत्येकी दहा हजारसंजय राठोड

यवतमाळ: पोलीस अधीक्षकांचा दातृत्वपणा; 10 अनाथ बालकांच्या नावे प्रत्येकी दहा हजार

यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाढदिवसानिमित्त कोरोनामुळे माता-पित्याचे छत्र हरविलेल्या चिमुकल्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण केली आहे.

संजय राठोड

यवतमाळ: यवतमाळच्या Yavatmal जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाढदिवसानिमित्त Birthday कोरोनामुळे माता-पित्याचे छत्र हरविलेल्या चिमुकल्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण केली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दहा बालकांच्या नावे प्रत्येकी दहा हजार रुपयांची मुदत ठेव करून त्यांच्या नावाने प्रमाणपत्र दिले.

हे देखील पहा-

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी District Superintendent of Police वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनामुळे माता-पित्याचे छत्र हरविलेल्या चिमुकल्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करण्याचे काम करून दहा बालकांच्या नावे प्रत्येक दहा हजार रूपयांची एफडी केली. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दहा बालकांच्या नावे प्रत्येकी दहा हजार रुपयांची मुदत ठेव करून त्यांच्या नावाने प्रमाणपत्र दिले. ’बालकांनो, तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असा विश्‍वास दिला.

यवतमाळ: पोलीस अधीक्षकांचा दातृत्वपणा; 10 अनाथ बालकांच्या नावे प्रत्येकी दहा हजार
बायकोच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून मेहुणा फरार!

कोरोना काळात यवतमाळ जिल्ह्यातील दहा बालकांच्या माता-पित्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे ते अनाथ झाले. अशा दहा बालकांच्या दु:खावर फुंकर घालत, त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आश्‍वस्त करीत त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा सन्मान केला. भविष्यात शिक्षणासाठी मदतीची गजर पडल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. खाकीतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दाखविलेल्या या औदार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com