शरीरसुखास विराेध; पत्नी दिशा ठाकरेचा संताेषने केला खून

शरीरसुखास विराेध; पत्नी दिशा ठाकरेचा संताेषने केला खून
Crime News

- संजय राठोड

यवतमाळ Crime News : पत्नी शरीरसुखास कायम विराेध करत असल्याने पतीने तिची हत्या केल्याची घटना आज (रविवार) घाटंजी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेतील पती-पत्नींमध्ये सातत्याने वाद हाेत असत असे पाेलिसांनी सांगितले. या वादातातूनच ही हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान पाेलिसांनी संशयित आराेपी संताेष ठाकरे यास ताब्यात घेतले आहे. yavatmal-ghatnji-police-santosh-thackeray-beats-wife-disha-crime-news-sml80

Crime News
'हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर' असं सेनेचं वागणं : खाेत

पगंडी येथे राहणा-या संतोष गुरुदेव ठाकरे व त्याची पत्नी दिशा या दाेघांत नेहमीच शारीरिक सुखाचा कारणावरून वाद होत असे. आज हा वाद एवढ्या विकोपाला गेला की संताेषने चक्क दिशाला ठार मारले. या धक्कादायक घटनेची माहिती समजातच परिसरात एकच गर्दी झाली.

या घटनेबाबत पोलिस निरीक्षक मनीष दिवटे म्हणाले शरीरसुखाच्या कारणावरून पतीचा राग अनावर झाल्याने कुर्‍हाडीने पत्नीच्या डोक्यात त्याने घाव घातला. त्यामुळे ती जागीच ठार झाली. घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेमुळे पती, पत्नीच्या पवित्र नात्याला कलंक लागल्याची भावना व्यक्त हाेऊ लागली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.