कोर्ट आवारात अस्‍वलाचा धुमाकूळ; लोकांनी केली तोबा गर्दी

कोर्ट आवारात आस्वलाचा धुमाकूळ; लोकांनी केली तोबा गर्दी
Yavatmal News
Yavatmal NewsSaam tv

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळच्या घाटंजी तालूक्यात निबंर्डा, मोवाडा घाटंजी ते यवतमाळ (Yavatmal) रोडने पट्टेवाल्या वाघाचे अनेकांना बरेचदा दर्शन झाले आहे. त्यात घाटंजी शहरातील घाटी परिसरात रात्रीच्या दरम्यान अचानक अस्वल कोर्टाच्या (Court) आवारात घुसले. अस्वलाला बघण्यासाठी लोकांची एकच गर्दी उडाली होती. (Yavatmal Court News)

कोर्टात अस्‍वल आल्‍याने धावपळ उडाली होती. अस्‍वल पाहण्यासाठी जमलेली गर्दी पागवण्यासाठी पोलीसांनी (Police) तारेवरची कसरत करावी लागली. रात्री आठ ते बारापर्यंतही वन अधिकारी नसल्याने वनकर्मचारी अधिकार्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर रात्री बाराच्या नंतर रेस्क्यू टीम वर्धा पांढरकवडा येथील वन अधिकारी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अस्वलाला कोर्टाच्या आवारात बेशुद्ध करण्याचे इंजेक्‍शन देताच अस्वलाने धुम ठोकली. संपुर्ण घाटी परिसरातुन फिरून (Forest Department) वन विभागाच्‍या टिमला अखेर मोठ्या पुलाजवळ अस्वलाला ताब्यात घेऊन सुटकेचा श्वास घेतला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com