
संजय राठोड
यवतमाळ - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून दिग्रसच्या श्याम गायकवाड याने विरुगिरी आंदोलन केले. सकाळी सात वाजता हा तरुण टॉवरवर चढला. ही बाब लक्षात येताच खळबळ उडाली. श्याम गायकवाड हा दिग्रस तालुक्यातील रहिवासी असून, तो यापूर्वी अनेकदा टॉवरवर चढला आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून त्याने प्रशासनाला जेरीस आणले.
हे देखील पाहा -
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी त्याने लावून धरली. दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील शेत सर्व्ह नंबर सात या शाळेच्या जमिनिवरील आणि काही शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून ती जमीन गरिबांना वाटप करण्यात यावी,तसेच आपल्यावरील जुना आत्महत्येचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी टॉवरवर चढला.
घटनास्थळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, आपत्ती पथक, अग्निशमन दल दाखल झाले. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कुणाचे काही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.