Yavatmal News : हृदयद्रावक! गणिताचा पेपर सोडवताना विद्यार्थ्यांचा मृत्यू

या घटनेने मोठी खळबळ माजली आहे.
Yavatmal News
Yavatmal NewsSaam Tv

संजय राठोड

Yavatmal Latest News : यवतमाळ येथून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. गणिताचा पेपर सोडविताना एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यवतमाळच्या बाभुळगाव येथील ही घटना आहे. या घटनेने मोठी खळबळ माजली आहे. प्रतीक थोटे रा.सरुळ असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. (Yavatmal Latest News In Marathi)

Yavatmal News
Dhule Accident : शिरपूर पुलावरील भीषण अपघाताचं कारण आलं समोर; नदीत पडलेला ट्रक अद्याप सापडेना

प्रतीक हा गणिताचा पेपर सोडवित असताना अचानक त्याला फिट आला आणि जागेवरच कोसळला. तेथील शिक्षकांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी (Doctor) त्याला मृत घोषित केले.

प्रतीक हा इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. पर देताना त्याने तीन पुरवण्या घेत उत्तमरित्या पेपर सोडवत असताना चार वाजताच्या दरम्यान त्याला अचानक फिट आला आणि जागेवरच कोसळला आणि प्रतीकचा मृत्यू झाला.

Yavatmal News
Ahmednagar News: धडकी भरवणारी घटना; रेल्वे रुळावर अडकली उसाने भरलेली ट्रक

प्रतिक हा खेळात व अभ्यासात हुशार होता. त्याने नुकत्याच झालेल्या मैदानी खेळ खो खोमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. प्रतिकवर काही महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यात त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असतांनाच आज अचानकपणे त्याने जगाचा निरोप घेतला. या घटनेने मोठी खळबळ माजली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com