दारुच्या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त; मुलांसह बायको सोडून गेल्याने नवऱ्याने संपवलं आयुष्य

सत्यजितने पत्नीला वारंवार सासरी आणण्याचा प्रयत्न करूनही पत्नी त्याच्यासोबत यायला तयार झाली नाही.
Yavatmal News
Yavatmal Newsसंजय राठोड

संजय राठोड -

यवतमाळ: नवऱ्यासोबत होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळून पत्नी माहेरी गेल्याने पतीने घरात गळफास घेत आपलं आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात घडली आहे. पती-पत्नीमध्ये भांडण होत असतात. रागाने पत्नी आपल्या माहेरी देखील निघून जाते. ही काही नवी बाब नाही.

मात्र, पत्नी माहेरी गेल्याने आयुष्यात आलेल्या नैराश्याला कंटाळून यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील आसरा या गावामधील सत्यजित रामदास मडावी याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सत्यजित आणि त्याच्या पत्नीन मध्ये किरकोळ कारणावरुन सतत वाद होत असतं. सत्यजितला दारुचं व्यसन होतं. त्यामुळे या दोघा नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झालं आणि आठ महिन्यापूर्वी दोन मुलांनासोबत घेऊन पत्नी आपल्या माहेरी निघून गेली. तेव्हापासून सत्यजित हा एकटाच घरी राहत होता. अशात त्याने आज (रविवारी)सकाळीच आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

पाहा व्हिडीओ -

मृतक सत्यजितला दारूचे व्यसन होते. या आधी देखील त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या दरम्यान वेळीच उपचार झाल्याने तो मृत्यूच्या दारातून सुखरूप परतला होता. मात्र, त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नी निकीता मडावी ही आठ महिन्यापूर्वी आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी गेली होती.

सत्यजितने पत्नीला वारंवार सासरी आणण्याचा प्रयत्न करूनही पत्नी त्याच्यासोबत यायला तयार झाली नाही. पत्नी आणि मुलांशीवाय राहणाऱ्या सत्यजीतचं जीवन तणावग्रस्त झालं होतं. पत्नी आणि दोन मुलांच्या विरहात अंत्यत वाकुळपणे जीवन जगणे कठीण असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Yavatmal News
Amravati : शिवाजी शिक्षण संस्था निवडणुकीत राडा; मी इथंच थांबणार, आमदार भुयार म्हणाले...

दहा वर्षापूर्वी सत्यजितने पत्नी निकीतासोबत संसार थाटला होता. परंतू लग्नाच्या काही महिन्यानंतर दोघांमध्ये विविध कारणावरून दोघात वाद व्हायचे. शिवाय पती व्यसनाच्या आहारी गेल्याने आठ महिन्यापूर्वी पत्नी निकीता दोन्ही मुलांना सोबत घेऊन माहेरी गेली. तेव्हापासून सत्यजित दारूच्या व्यसनात बुडाला अखेर मानवी जीवाचा त्याग करून सत्यजितने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com