Yavatmal Rain News: यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस! अनेक ठिकाणी पूरस्थिती; बचावकार्य सुरू

Yavatmal Rain Updates: पुरात अडकलेल्या ४५ जणांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर पोहोचणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे
Yavatmal Rain News
Yavatmal Rain NewsSaamtv

संजय राठोड, प्रतिनिधी...

Mahagaon Flood: यवतमाळ जिल्ह्याच्या विविध भागाला शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले. जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला असून अवघ्या २४ तासात यवतमाळ तालुक्यात २३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर महागाव तालुक्यात १३१ मिमी पावसाची नोंद झाली असून १६ पैकी १४ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. (Yavatmal Weather Update)

Yavatmal Rain News
CM Eknath Shinde News: कुटुंबाची इच्छा होती म्हणून पंतप्रधानांना भेटलो, मोदींना भेटल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

यवतमाळ (Flood In Yavatmal) जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. बुधवारी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारी यवतमाळमध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शुक्रवारही पावसाचा जोर खूप जास्त होता. जिल्ह्यात सरासरी १९.८ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ६९.१ मिमी पाऊस उमरखेड तालुक्यात झाला आहे.

या पावसामुळे पैनगंगा,अरूणावती,अडाण,वाघाडीसह नाल्यांना पूर आल्याने शहरासह अनेक गावात पाणी शिरले.पैनगंगा आणि अरुणावती ह्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतुक बंद असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. तसेच जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. (Maharashtra Weather Update)

Yavatmal Rain News
Pandharpur News: स्मशानातून होतेयं मृत व्यक्तीच्या राखेची चोरी! विचित्र प्रकाराने पंढरपुरात खळबळ; धक्कादायक कारण समोर

विशेष म्हणजे पैनगंगा ( Painganga River) नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरखेड,महागांव,आर्णी तालुक्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महागांव (Mahagaon Flood) तालुक्यातील आनंद नगर इथे पुरात चाळीस जण अडकून पडले आहेत. त्यामुळेच या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे.

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा...

दरम्यान, पालकंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेवून नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. तसेच पुरात अडकलेल्या ४५ जणांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर पोहोचणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे... (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com