यवतमाळमधील 'तो' रस्ता पुन्हा होणार; बांधकाम मंत्र्यांनी घेतली होती दाखल

रविवारी दुपारी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचानाम केला. सदर काम अंत्यत निकृष्ट दर्जाचा झाल्याचे मान्य करीत सदर कंत्राटदाराकडून पुन्हा काम करून घेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.
Yavatmal Road Issue
Yavatmal Road Issueसंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ - अखेर पोखरी ते माळहिवरा या रस्त्याचा पंचनामा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (Construction Department) पुसदचे कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी व महागाव येथील अभियंता संजय मंत्री यांनी सदर कामाचा पंचनामा करून रस्त्याचे (Road) काम पुन्हा करण्यात येईल व संबधीत कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (Yavatmal Road Issue News Update)

हे देखील पहा -

रस्ते, विज आणि पाणी ह्या विकासाच्या महत्वाच्या बाबी आहेत. रस्ते हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी रस्त्यांसाठी शासनाकडे आग्रह धरून निधी उपलब्ध करून घेतात, मात्र उपलब्ध शासकीय निधीचा विनियोग योग्यरित्या न करता तो अधिकारी व कंत्राटदार यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कसा होतो याचे अनेक उदाहरण पहायला मिळतील.

मात्र एखादा डांबरी रस्त्याचे काम चक्क हाताने उकरण्या इतपत निकृष्ट काम झाले. यवतमाळ जिल्ह्यात पोखरी, वाकन ते माळहिवरा दरम्यान झाल्याची बातमी साम टिव्हीने दाखवल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दखल घेऊन संबंधित कामाची तातडीने चौकशी करण्यात येईल असे म्हटले होते.

Yavatmal Road Issue
Buldhana Farmers: दिवसा वीज मिळत नसल्याने शेतकरी हतबल!

रविवारी दुपारी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचानाम केला. सदर काम अंत्यत निकृष्ट दर्जाचा झाल्याचे मान्य करीत सदर कंत्राटदाराकडून पुन्हा काम करून घेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com