यवतमाळ: शस्त्रक्रिया करायचीय? तर खाटा घरून आणा; ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सलाईन वर

आरोग्य मंत्री आणि महिला बालकल्याण मंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची होतेय मागणी..
यवतमाळ: शस्त्रक्रिया करायचीय? तर खाटा घरून आणा; ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सलाईन वर
Yavatmal News In Marathiसंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ: सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना नागरिक करत आहेत. अशात आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे सांगितल जातेय. मात्र, यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील आदिवासीबहुल पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करण्यासाठी वैधकिय आरोग्य अधिकाऱ्यांनी चक्क गरोदर मातांना खाटा घरून आणा, त्यानंतरच कुटुंब शस्त्रक्रिया करू असा अजब सल्ला दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर आलेल्या गरिबीचा उत्कृष्ट नमुना पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसून आलाय.

घरून खाटा आणत असाल तर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जाईल अशी अट घालण्यात आली होती. घरून खाटा आणल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तेव्हा कुठे खाटा आणल्या नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Yavatmal News In Marathi
शिवसेना 50 जागा लढवणार, UPमध्ये परिवर्तन निश्चित; राऊतांनी व्यक्त केला विश्वास

धक्कादायक म्हणजे, महिलांना कुडकुडत उपचार घ्यावे लागत आहे. यावरून आरोग्य यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याविषयी किती बेफिकीर आहे याचे चित्र घाटंजी तालुक्यातील पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसून आले. शस्त्रक्रिया साठी १८ महिलांना बोलविण्यात आले. परंतू खाटा कमी असल्याने आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याने घरून खाटा आणायला सांगितल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

पारवा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत एकुण ४४ गावांचा समावेश आहे. दरम्यान कुटूंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिला रूग्णांना यंत्रणेकडून त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड प्राथमिक आरोग्य केंद्रात दिसून आली. ता. ७ जानेवारी रोजी शस्त्रक्रिया निश्चित करण्यात आल्याने सकाळी आठ वाजता पासून महिलांना उपाशी राहण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या दिवशी डाॅक्टरच आले नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रियासाठी आलेल्या महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला. या गंभीर घटनेमुळे आरोग्य विभागावर संताप व्यक्त केल्या जात आहे.

हे देखील पहा-

प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत;

पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची सुविधा नसल्याचे समोर आले आहे. नेहमी साफसफाई होत नसल्याने ठिक ठिकाणी घाण आणि मद्य चे खाली बाॅटल आढळून आले. त्यामुळे या गंभीर विषयाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com