Yavatmal: हत्येचा थरार; दहा जणांच्या टोळीने केला तरुणाचा खून!

पुसद शहर एकदा पुन्हा तरुणाच्या हत्येने हादरले आहे. पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या कमानी समोर मंगळवारी रात्री दरम्यान एका युवकाची हत्या करण्यात आली आहे.
Yavatmal: हत्येचा थरार; दहा जणांच्या टोळीने केला तरुणाचा खून!
Yavatmal: हत्येचा थरार; दहा जणांच्या टोळीने केला तरुणाचा खून!Saam Tv

संजय राठोड

यवतमाळ - पुसद Pusad शहर एकदा पुन्हा तरुणाच्या हत्येने हादरले आहे. पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या कमानी समोर मंगळवारी रात्री दरम्यान एका युवकाची हत्या Murder करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

मनोज सवंगडे (वय 22 वर्ष) रा. भीमनगर श्रीरामपूर पुसद असे मृत तरूणाचे नाव आहे. शहरातील सरकारी दवाखान्याच्या कमानीजवळील रोडवर तरुणाची हत्या झाली. ही हत्या जुन्या आपसी वादातून झाली असल्याचे बोलले जात आहे.

Yavatmal: हत्येचा थरार; दहा जणांच्या टोळीने केला तरुणाचा खून!
केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत फटाक्यांवर बंदी

तरुणाच्या पाठीवर 7 ते 8 शास्त्राने वार करण्यात आले आहेत. तसेच या तरुणाला 10 जणांनी मारलं असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेचा तपास पुसद शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला आणि त्यांची टीम करत असून या घटनेमुळे सर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com