यवतमाळकरांचा मॉर्निंग वाॅक ठरतोय जीवघेणा

गोधणी मार्गावर बायोवेस्टचा खच, नगर पालिकासह पोलीसांची अनास्था
यवतमाळकरांचा मॉर्निंग वाॅक ठरतोय जीवघेणा
यवतमाळकरांचा मॉर्निंग वाॅक ठरतोय जीवघेणासंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ - भल्या पहाटे झोपेतून जागे होत यवतमाळकर नागरिक वृद्ध, तरुण आणि बालकेसुद्धा शुद्ध ऑक्सिजनसाठी घराबाहेर पडतात. येथील गोधनी मार्गावर पहाटे मार्निंग वाॅक करणाऱ्यांची अक्षरचा वर्दळ असते मात्र आता हा मॉर्निंग वाॅक यवतमाळकरांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे चित्र गोधनी मार्गावर दिसून येत आहे. बायोवेस्टच्या आरोग्याला अपायकारक वस्तू या ठिकाणे टाकण्यात येत आहे. नगरपालिका पोलिसांचाही या गंभीर बाबी बाबत अनास्थाच असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतर ठेवल्या जाणाऱ्या भरण्या, रक्ताच्या नमुन्याचा बाटल्या, वापरलेल्या सिरीज, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, हॅन्ड ग्लोज आदी रुग्णालयातून आणि पॅथालाॅजी लॅबमधून निघालेला टाकावू कचरा शहरातील गोधणी मार्गावरील हिरवळीच्या ठिकाणी टाकला जातो. हा प्रकार गेल्या कित्येक महिन्यापासून सुरू आहे.

हे देखील पहा -

गोधणी या मार्गावर बायोवेस्टचा खच निर्माण झाला आहे. त्यातून परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटते. शिवाय,मोकाट कुत्रे आणि जनावरांचा या खचावर मुक्तवावर असतो. त्यामुळे अनेक वेळा या मोकाट जनावरांच्या हल्ल्याला देखील नागरिकांना समोर जावा लागतो. शासनाने नागरिकांना शुद्ध हवा मिळावी या हेतूने कोट्यावधी रुपये खर्च करून गोधणी मार्गावरील वन जमिनीवर ऑक्सीजन पार्क उभारले.

यवतमाळकरांचा मॉर्निंग वाॅक ठरतोय जीवघेणा
अल्पवयीन भाऊ -बहिणीवर लैंगिक अत्याचार; प्रेयसी आणि प्रियकराचा प्रताप...

शिवाय प्रयास या सामाजिक संघटनेने सामाजिक बांधिलकीतून पर्याय वनाची निर्मिती केली. मात्र या दोन्ही समाज उपयोगी प्रकल्पांना आता या बायोवेस्टच्या गंभीर बाबीने तडा दिला आहे. याचा प्रचंड त्रास मार्निंग वाॅकला जाणाऱ्या नागरिकांना होत आहे. तेव्हा काही जागरूक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी यासंदर्भात स्थानिक नगरपालिका पोलीस आणि वन विभागाकडे अनेक तक्रारी केल्या मात्र उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी आता दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या बायोवेस्टचा प्रश्न निकाली काढण्यासाठी निवेदन दिले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com