Amravati : शॉक लागून वसतीगृह अधीक्षकांचा मृत्यू; येवद्यात शाेककळा

या घटनेमुळं विद्यार्थी हळहळ व्यक्त करु लागले आहे.
Subhash Deshmukh, Amravati News
Subhash Deshmukh, Amravati Newssaam tv

- अमर घटारे

अमरावती : विद्युत प्रवाहाच्या झटक्याने अमरावती (amravati) जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील महात्मा ज्योतिराव फुले मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहाचे अधीक्षक बाळू उर्फ सुभाष देशमुख (वय ६५) यांचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Amravati Latest Marathi News)

याबाबत मिळालेली माहिती अशी देशमुख हे वस्तीगृहात गेल्यानंतर त्यांनी स्टोअर रूमची लाईट लावण्यासाठी बटण सुरु केले. परंतु बटणातील ओलाव्यामुळे त्यांना विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. त्यात ते जमिनीवर काेसळले. रक्षाबंधनासाठी सर्व विद्यार्थी आपआपल्या घरी (सुट्टीवर) गेल्याने त्यांना कसलीच मदत मिळू शकली नाही.

यावेळी घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी व पोलिसांनी (police) यांनी येऊन पंचनामा केला. वस्तीगृह अधीक्षक सुभाष देशमुख हे मन मिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Subhash Deshmukh, Amravati News
Amravati : अमरावतीत १ लाख ९९ हजार हेक्टर शेतीचं नुकसान; संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 250 काेटींचा फटका
Subhash Deshmukh, Amravati News
Yashomati Thakur : शिंदे-फडणवीस सरकारचं हे ‘व्हाईट वॉश’ मंत्रिमंडळ आहे का ? (व्हिडिओ पाहा)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com