महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाच्या पाठीत खंजीर खूपसला; योगेश टिळेकरांचा आरोप

'बा विठ्ठला' ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची आघाडी सरकारला सुबुद्धी दे !
महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाच्या पाठीत खंजीर खूपसला; योगेश टिळेकरांचा आरोप
महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाच्या पाठीत खंजीर खूपसला; योगेश टिळेकरांचा आरोप भारत नागणे

पंढरपूर : भाजप ओबीसी OBC मोर्चा जागर अभियानाचा शुभारंभ आज पंढरपुरातून करण्यात आला. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर Yogesh Tilekar यांनी महाविकास आघाडी सरकारवर MVA Goverment हल्लाबोल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray मराठा आणि ओबीसी Maratha And OBC दोन्ही समाजाचा विश्वास घात केल्याचा आरोप केला तसेच 'बा विठ्ठला' ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची आघाडी सरकारला सुबुद्धी दे असं साकडं टिळेकरांनी विठ्ठलाला घातले.(Yogesh Tillekar's allegation that MVA government betrayed the trust of OBC community)

हे देखील पहा -

तसेच टिळेकर पुढे म्हणाले 'महाविकास आघाडी सरकारने ओबीसी , मराठा आणि अनुसूचित जाती जमातीचा विश्वासघात केला आहे. आरक्षण मिळावे यासाठी सर्व समाज बांधवांचा जागर आता सुरू झाला आहे. हे सरकार ओबसी लोकांना पायदळी तुडवत आहे. आमचे राजकीय आरक्षण Political reservation पूर्ववत करावे. पुढचा दीड महिना जागर अभियान राज्यभर सुरू राहील.'

महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाच्या पाठीत खंजीर खूपसला; योगेश टिळेकरांचा आरोप
नवाब मलिक उगाच सनसनाटी निर्माण करत आहेत; प्रविण दरेकरांचा आरोप

ओबीसी चे राजकीय आरक्षण पूर्ववत केल्या शिवाय निवडणुका Election घेणार नाही. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या आहेत. ठाकरे सरकारला पांडुरंगाने सू बुद्धी द्यावी. आमचा इम्परिकल डाटा Imperial data राज्याने लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात Supreme Court सादर करून आमचे राजकीय आरक्षण द्यावे. तो पर्यंत महाराष्ट्रातील कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष BJP OBC Morcha State President योगेश टिळेकर यांनी केली.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com