
- शुभम देशमुख
Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे एका शिक्षिकेचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. योगिनी प्रभुदास कुंभलकर (वय 52) (yogini kumbalkar) असे अपघातामधील मृत शिक्षिकेची नाव आहे. या घटनेची माहिती कुंभलकर यांच्या परिचितांना तसेच विद्यार्थ्यांना समजताच सर्वजण गहिवरले. (Maharashtra News)
या अपघाताबाबत पाेलीसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी - तिरोडा (tiroda) येथे आज (शुक्रवार) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास टिप्पर रेती भरुन निघाला हाेता. शहीद मिश्रा विद्यालय जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोर याेगिनी कुंभलकर यांच्या दुचाकीला टिप्परने धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शिक्षिका योगिनी प्रभुदास कुंभलकर शहीद मिश्रा वार्ड तिरोडा येथील निवासी असून त्या प्रगती आश्रमशाळा सरांडी (ता.तिरोडा) येथे प्राथमिक शिक्षिका पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या मागे पती, दोन मुली व मुलगा असून दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.