पत्नीच्या जाचाला कंटाळून तरुण व्यावसायिकाची आत्महत्या; शेवटच्या मेसेजमधून धक्कादायक खुलासा

Suicide of a young businessman in Barshi taluka of Solapur : एका तरुण व्यावसायिकानं एवढ्या टोकाचं पाऊल उचलल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
पत्नीच्या जाचाला कंटाळून तरुण व्यावसायिकाची आत्महत्या; शेवटच्या मेसेजमधून धक्कादायक खुलासा
Suicide of a young businessman in Barshi taluka of Solapurविश्वभूषम

सोलापूर: नवरा-बायकोचं भांडण काही नवीन गोष्ट नाही. संसाराचा गाडा हाकताना एकमेकांशी छोटे-मोठे वाद-विवाद होतच असतात. मात्र या वादाचं रुपांतर तणावात झालं की त्याचे परिणाम गंभीर होतात. सोलापूरच्या (Solapur) बार्शी तालुक्यात याचा प्रत्यय आला आहे. बार्शीमध्ये एका मंडप डेकोरेटर व्यावसायिकाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली (Suicide) आहे. संतोष गायकवाड अशा या आत्महत्या केलेल्या तरुण व्यावसायिकाचं नाव असून त्यांनी एवढ्या टोकाचं पाऊल उचलल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. (Suicide of a young businessman in Barshi taluka of Solapur; In the last message sent to friends on WhatsApp he wrote reason for suicide)

हे देखील पाहा -

आत्महत्या केलेले संतोष गायकवाड यांचा बार्शी तालुक्यात मंडप डेकोरेटरचा व्यवसाय आहे. त्यांनी स्वतःच्याच दुकानात आत्महत्या केली आहे. पंख्याला कापडाची पट्टी बांधून गळफास घेत त्यांनी आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्याच्या काही मित्रांना व्हॉट्सॲपवर मेसेज केला होता. या मेसेजमध्ये त्यांनी आपण आत्महत्या का करतोय याचं कारण सांगितलं. या मेसेजमध्ये त्यांनी त्यांची बायको, सासरे आणि मेव्हणीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र "माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये" अशी विनंतीही त्यांनी पाठवलेल्या शेवटच्या मेसेजमधून केली आहे.

Suicide of a young businessman in Barshi taluka of Solapur
१२ वी च्या परिक्षेत पास होऊनही विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण आलं समोर

मृत संतोष गायकवाड यांनी मित्रांना पाठवलेला शेवटचा व्हॉट्सॲप मेसेज (सुसाईट नोट)

शेवटचा नमस्कार आपणास माझा..मी माझ्या बायकोच्या टेंशनमुळे हा निर्णय घेतोय..गेली आठ महिन्यापासुन मी स्वत: खुपच टेशन मध्ये जगत होतो, पण आता माझी सहन करायची क्षमता संपली आहे. आजपर्यंत आपण मला खुप सहकार्य केले आहे. तरी हिच भावना माझ्या मुलांन बद्दल राहु द्दा हिच आपल्या कडुन मला खरी श्रंधाजली असेल....माझ्या ह्या आत्महत्याच्या निर्णयात कुणाचाही सहभाग कींवा अडचन नाहि.. हा निर्णय मी फक्त आणी फक्त माझ्या बायकोमुळे घेत आहे.. माझी बायकोला होत असलेली अडचन मी स्वत: दुर करीत आहे.. जगाला दाखवन्यासाठी चार दिवस रडुन तु (अनुराधा गायकवाड ) एकदम निवांत हो....पायल व विराज बाळा तुम्हि आईसोबत एकञ रहा.. पायल मी तुझा खरच अपराधी आहे बाळा. पिल्लु.. पुन्हा एकदा आपल्या सर्वाना शेवटचा जय शिवराय........

माझ्या आत्महत्याचा निर्णयात कुणाचाही सहभाग नसुन हा माझा निर्णय आहे. यासाठी कुणीही कोनत्याही व्यक्तीला जबाबदार धरू नये.... शेवटी माझ्या बायकोची, मेव्हणीची, सासुची ईच्छा पुर्ण व्हावी म्हणुन हा मी निर्णय घेत आहे. मला गेली आठ महिन्यापासुन माझ्या सासुने, मेव्हणी (रेणुका साखरे), व बायकोने खुपच त्रास दिला आहे. व त्यांची इच्छा पुर्ण व्हावी म्हणुन मी आत्महत्या करीत आहे. आपलाच...

श्री. संतोष भास्कर गायकवाड, पाथरी बार्शी

मृत संतोष गायकवाड यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अचानकपणे एका तरुण व्यवसायिकाने केलेल्या या आत्महत्येमुळे बार्शी तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com