नदी ओलांडून बाजारात आला अन जीव गमावून बसला; पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

Gondiya : चुन्नीलाल हा येताना नदी ओलांडून महालगावात आला होता.
नदी ओलांडून बाजारात आला अन जीव गमावून बसला; पाण्यात बुडून एकाचा मृत्यू
Gondiya NewsSaam Tv

गोंदिया : बाजारात बैल विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाचा नदी ओलांडून परत जात असतांना बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना गोंदिया जिल्ह्याच्या महालगाव मुरदाळा येथील वैनगंगा नदी पात्रात घडली. चुन्नीलाल पूनाजी रणगडे (वय 55) वर्ष रा. खैरलांजी जिल्हा. बालाघाट ( मध्य प्रदेश) असे मृतकांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत चुन्नीलाल हा गोंदिया जिल्ह्यातील महालगाव मुरदाळा येथे बुधवारी (11 मे) बैलाचा बाजार असल्याने बैल विक्री करीता आला होता. चुन्नीलाल हा येताना नदी ओलांडून महालगावात आला होता. मात्र, परत जात असताना सायंकाळ झाल्याने त्याला नदीतील खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाय घसरून तो नदीत पडला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला.

Gondiya News
बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला तिहेरी जन्मठेप; सत्र न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निकाल

दरम्यान, या घटनेची माहिती दवणेवाडा पोलिसाना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा शोध घेण्याची सुरूवात केली. मात्र नदीत मुबलक पाणी असल्याने पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी गुरूवारी (12 मे) चुन्नीलालचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढला. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात पाठवला असून याप्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.