Parbhani : ट्रेनखाली उडी मारुन २४ वर्षीय युवकाने संपवलं आयुष्य; कारण अस्पष्ट

Parbhani Suicide News: दीपक वाटुरे असे या आत्महत्या केलेल्या मयत युवकाचे नाव आहे.
Parbhani Suicide News
Parbhani Suicide Newsराजेश काटकर

परभणी: परभणी (Parbhani) जिल्ह्यात रेल्वे रुळावर एका 24 वर्षीय युवकाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानवतच्या कोल्हावाडी शिवारात ही घटना घडली असून दीपक वाटुरे असे या आत्महत्या केलेल्या मयत युवकाचे नाव आहे. युवकाच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. (Parbhani Latest News)

हे देखील पाहा -

या युवकांच्या मानेवरून रेल्वे (Railway) गेल्याने त्याचे डोके धडापासून वेगळे झाले आहे. दीपक रावसाहेब वाटूरे (वय 24) ही मृत युवक सेलु तालुक्यातील वालुर येथील राहणारा होता. मानवतरोड ते देवलगाव अवचार दरम्यान कोल्हावाडी शिवारात पॅसेंजर आली असताना दीपक हा रेल्वे रुळावर झोपला आणि त्याने आपलं जीवन संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार युवकांच्या मानेवरून रेल्वे गेल्याने युवकाचे धड हे शरीरापासून वेगळे झाले आहे.

Parbhani Suicide News
BJP: भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी शेलार, तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची होऊ शकते निवड

या घटनेनंतर मृत युवकाच्या मृतदेहाचे कोल्हा येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या युवकाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढीत तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com