प्रेमासाठी कायपण! मैत्रिणीच्या नकारामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सहा महिन्यांची ती मैत्रीण चांगलीच फ्रेंड बनली. बरेच प्रेमाचे रंग उधळले. तिने मोबाईलवर प्रेमाला नकार दिला
प्रेमासाठी कायपण! मैत्रिणीच्या नकारामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
प्रेमासाठी कायपण! मैत्रिणीच्या नकारामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्नSaam Tv

सांगली : सहा महिन्यांची ती मैत्रीण चांगलीच फ्रेंड बनली. बरेच प्रेमाचे रंग उधळले. तिने मोबाईलवर प्रेमाला नकार दिला. अनं रागाच्या भरात बोलत- बोलत त्याने अपार्टमेंटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. सहा महिन्यांपासून असणाऱ्या मैत्रिणीसाठी एकुलत्या एक मुलाने जन्मदात्या आई- वडिलांना प्रचंड मानसिक धक्का दिला आहे. पण गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत असणाऱ्या दीपक ठोंबरे या कर्मचाऱ्यांच्यामुळे त्याला जीवदान मिळाले आहे. हे ऐकून आई-वडिलांनी अश्रू ढाळत पोलीसांचे आभार मानले आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मध्ये आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या प्रेमवीर तरुणाला सतर्क पोलिसांनी जीवदान दिले आहे. मैत्रिणीने प्रेमाला नकार दिल्याने प्रेमवेडा तरुण थेट राहत्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर जावून संरक्षक भिंतीवर चालत होता. व्हिडिओ कॉल करून, मैत्रिणीला प्रेमाचा होकार मिळवण्यासाठी विनवणी करत होता. पण तिने प्रेमाच्या रिलेशनला साफ नकार देत आपण मैत्री ठेवू असे सुनावले आहे. मग थेट तरुणाने आरडा-ओरडा करत आत्महत्येची तिला धमकी दिली.

हे देखील पहा-

इस्लामपूरातील पेठ रस्त्यावरच्या विलासराव पाटील पंपाच्या पाठीमागे पाटील इस्टेट या ३ मजली इमारतीच्या छतावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं हा तरुण भाडयाने वास्तव्यास आहे. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधताना तुला काय करायचे ते कर? असे सांगणाऱ्या तरुणीला तो भीती दाखवत होता. तेव्हा काही तरुणांनी पोलिसांना कळवले. पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान राखून बिल्डिंगच्या छतावर धाव घेतली आहे. निराश होऊन आत्महत्येचा विचार बोलून दाखवणाऱ्या तरुणाला बोलण्यात गुंतवून त्यास ताब्यात घेतले आहे. आणि त्याचे मनपरिवर्तन करत त्याचे जीव वाचवले आहे. त्याठिकाणी जमलेल्या लोकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

प्रेमासाठी कायपण! मैत्रिणीच्या नकारामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Heavy Rains: हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रेमवेड्या तरुणाला पोलीस ठाण्यात आणले आणि त्याचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्याच्या आई- वडिलांना बोलावून घेत घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. संबंधित तरुण अवघ्या २० वर्षाचा आहे. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत येथील एका कॅफेत कुक म्हणून काम करत आहे. त्याचे कुटुंबीय जयसिंगपूर या ठिकाणी वास्तव्यास आहेत. तो मूळचा नेर्ले या ठिकाणचा आहे. आई- वडिलांना या घटनेची माहिती थेट पोलीस ठाण्यात आल्यावर समजली आहे. तेथे मुलाच्या या कृत्याने आई- वडिलांनी अश्रू अनावर झाले होते. आईने धुणी- भांडी करून, तुला मोठे केले आहे यासाठीच का ? असे  खडे बोल पोलिसांनी सुनावले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com