
Pandharpur Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, पंढपुरात एक अशी घटना घडली आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. (Latest Marathi News)
पंढपूर (Pandharpur) शहरात एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला पळवून नेलं आहे. तरुणीला पळून नेताना त्याने तिच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला देखील केला आहे. या घटनेच तरुणीची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
प्राप्त माहितीनुसार, पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या टाकळी बायपास रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. जखमी महिला तिच्या २१ वर्षीय मुलीला परीक्षेसाठी महाविद्यालयात दुचाकीवरून सोडवण्यासाठी गेली होती. यावेळी भर रस्त्यात देवगाव येथे राहणाऱ्या सागर घाडगे या तरुणाने त्यांची दुचाकी अडवली.
सागर आणि त्याच इतर मित्रांनी तरुणीसोबत तिच्या आईला शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर तरुणीच्या आईवर धारधार शस्त्राने वार केले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत तिथेच सोडून आरोपीने (Crime News) तरुणीला घेऊन पळ काढला.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या महिलेला परिसरातील नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी सागर याचा शोध घेण्यासाठी एक पथक तैनात केले आहे. आईच्या नजरेसमोरच भरदिवसा एका तरुणीला पळवून नेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.