प्रेम न मिळाल्याने तरुण वेडापिसा; चक्क आमदारांना घातलं साकडं

मुलगी पटत नाहीये, निराश तरुणाचे आमदारांना पत्र
प्रेम न मिळाल्याने तरुण वेडापिसा; चक्क आमदारांना घातलं साकडं
प्रेम न मिळाल्याने तरुण वेडापिसा; चक्क आमदारांना घातलं साकडंसंजय तुमराम

चंद्रपूर : मुलगी भाव देत नाही, म्हणून खचलेल्या एका तरूणाचे थेट आमदारानांच पत्र... सोशल मीडियावर पत्र तुफान व्हायरल झाला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राच्या आमदारांना हे पत्र लिहिले आहे. माननीय आमदार साहेब सम्पूर्ण तालुक्यात भरभरून मुली आहेत. पण मला एकही मुलगी पटत नसून, ही चिंतेची बाब आहे. अशा भावना पत्रात व्यक्त केली आहे.

हे देखील पहा-

पत्र लिहिणारा तरुण खेड्यागावातून असून राजुरा- गडचांदूर या ठिकाणी दररोज जाणे- येणे करतो. परंतु, त्याला एकही मुलगी पटत नाही. असा मजकूर त्याने लिहिला आहे. सोबतच दारू विकणाऱ्याला आणि काळ्या पोरांना girlfriend असते. हे बघून अर्जदाराचा जीव जळून राख होतो असे यामध्ये त्याने लिहिले आहे. 

प्रेम न मिळाल्याने तरुण वेडापिसा; चक्क आमदारांना घातलं साकडं
शिवसेना आमदारांना पुन्हा नजरकैद? 5 दिवसांचे कपडे, आधार,पॅन कार्ड घेऊन येण्याचे आदेश

यात अर्जदार भूषण जांबुवंत राठोड याने आमदार साहेबाना विनंती केली की, राजुरा विधानसभा क्षेत्रातील मुलींना अर्जदाराला भाव देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. मात्र, हा अर्जदार नेमका कोण आहे आणि कुठे राहतो. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे आमदार सुभाष धोटे यांनी त्यांना अश्याप्रकारचे पत्र न मिळाल्याचे सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com