आदर्शवत! भावाचा अपघाती मृत्यू, दीराने विधवा वहिनीसोबत थाटला संसार

Bhandara News : दीराने आपल्या विधवा वहिनीसोबत लग्न करून समाजापुढे वेगळा आदर्श दिला आहे
Bhandara News
Bhandara News Saam Tv

भंडारा : लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती अपघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. अशाच एका महिलेचा संसार पतीच्या अकाली निधनाने मोडला होता. मात्र, हे सर्व प्रसंग आपल्या विधवा वहिनीवर येऊ नये, आपल्या अडीच वर्षाच्या पुतन्याला वडिलांचे प्रेम कमी पडू नये म्हणून एका मोठ्या मनाचा दीराने आपल्या विधवा वहिनीसोबत लग्न करून समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. एखाद्या सिनेमाच्या पटकथेप्रमाणे वाटणारी ही कथा वास्तविकरित्या भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील खापा येथे घडली आहे. (Bhandara Marriage Latest Marathi News)

Bhandara News
कौतुकास्पद! विधवा वहिनीसोबत दिरानं थाटला संसार

जुन्या रुढीपरंपरांना फाटा देत दीराने आपल्याच वहिनीसोबत लग्नगाठ बांधली आहे. विशाखा बुरडे असं या नवरी मुलीचं नाव असून विजय बुरडे असं नवरदेवाचं नाव आहे. माहितीनुसार, 3 वर्षापूर्वी विशाखा बुरडे या तरुणीचा विवाह खापा येथील योगेश बुरडे नामक तरुणासोबत झाला होता. योगेश हा एसटी महामंडळात नोकरी करत होता. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर योगेश आणि विशाखा यांना एक पुत्र देखील झाला. मात्र, मुलगा लहान असतानाच योगेशचा अचानक तुमसर-भंडारा राज्यमार्गावरील दहेगाव येथे अपघात झाला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मावळली. योगेशच्या अशा एकाकी जाण्याने बुरडे कुटुंबियांवर मोठा आघात झाला. त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी, अडीच वर्षाचा मुलगा, आई, वडील, लहान भाऊ, बहीण असा बुरडे परिवार होता.

पती योगेशच्या अपघाती निधनानंतर पत्नी विशाखावर जणू काही आभाळच कोसळलं. सुखी संसारात अचानक आलेल्या या संकटाने विशाखा हेलावून गेली. आता आपलं कसं होणार? या अडीज वर्षाच्या मुलाचं संगोपन कसे होणार असा प्रश्न तिला सतत भेडसावत होता. पतीच्या निधनाच्या विरहात विशाखा समाजात विधवा म्हणून दोन ते अडीच वर्षाच्या मुलांसोबत आपल्या सासरीच सासु, सासरे, दीर, यांच्यासोबत एकत्र वावरत होती. आपली सून समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा सौभाग्यवती म्हणून घरात सुनकन्या म्हणून वावरावी आणि नेहमी तिच्या कपाळावरचं कुंकु हसत खेळत असावं असा विचार तिचे सासरे किसना बुरडे यांच्या मनात आला.

त्यानंतर त्यांनी आपल्या लहान मुलगा विजय आणि विधवा झालेली सून विशाखा यांचा विवाह दोघांच्या सहमतीने करावा असा कयास बांधला. सुरुवातीला त्यांनी दोघांपुढे प्रस्ताव ठेवला. अचानक आलेल्या प्रस्तावाने दीर विजय विचारात पडला. मात्र अडीच वर्षाच्या पुतण्याच्या भविष्याचा विचार करत त्याने विवाहास होकार दिला. लहान मुलगा विजय आणि विशाखा दोघांनीही लग्नाला दुजोरा दिल्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांनी जुन्या रुढीपरंपरांना फाटा देत दिला दोघांचा विवाह 10 मे रोजी नातेवाईकांच्या उपस्थित नोंदणीकृत पद्धतीने लावून दिला.

दरम्यान, एकीकडे समाजात अल्पकालावधीत लग्न मोड़ने, घटस्फोट पती-पत्नीचे आपसी भांडणं असे प्रकार वाढत असताना, विजयने आपल्या विधवा वहिनीसोबत लग्नाला होकार देत समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विजयाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com