औरंगाबाद हादरलं! किरकोळ वादातून मित्राची हत्या

Aurangabad Crime News : किरकोळ वादातून तरुणाचा चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
औरंगाबाद हादरलं! किरकोळ वादातून मित्राची हत्या
young man stabbed to death by friend in aurangabad Saam Tv

औरंगाबाद : किरकोळ वादातून तरुणाचा चाकू भोसकून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहराच्या बायजीपुरा या भागात हा प्रकार घडला आहे. आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केल्यानंतर सदर तरुण जखमी अवस्थेत लोकांना मदतीची याचना करत होता. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोक कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. (Aurangabad Latest Crime News)

हे देखील पाहा -

शाहरुख अन्वर शेख असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादचा (Aurangabad) १८ वर्षीय युवक शाहरुख आणि त्याचा मित्र हैदर बायजीपुरा येथील सिंकदर हॉलसमोर बसले होते. दोघेही तरुण नशेत धुंद होते. दोन्ही मित्रांचे अचानक संवादाचे रुपांतर वादात झाले. वाद इतका टोकाला गेला की, मित्र हैदरने शाहरुखवर धारदार चाकूने वार केले. हैदरने मैत्रीचा विचार न करता शाहरुखच्या कंबर, पायावर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे शाहरुखला रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर शाहरुख क्षणार्धात जमिनीवर कोसळला. शाहरुखची स्थिती पाहून हैदर तेथून पसार झाला. जखमी झालेला शाहरुख लोकांना मदतीची याचना करत होता. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोक कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. शेवटी रस्त्यावरच शाहरुखने प्राण सोडले.

young man stabbed to death by friend in aurangabad
खोजनवाडीत घरफाेडी; सोन्याच्या दागिन्यांसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास

दरम्यान, आरोपी हैदरने केलेल्या हल्यात शाहरुखचा मृत्यू झाला. या भांडणावेळी आरोपी हैदर देखील जखमी झाला होता. पोलिसांनी आरोपी हैदरला ताब्यात घेतलं आहे. जखमी हैदरवर पोलिसांच्या देखरेखीत शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.