Jalgoan News: भररस्त्यात तरुणीने तरुणावर केला चाकूहल्ला, जळगावचा Video होतोय व्हायरल

Latest News: या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Jalgaon Crime
Jalgaon Crime Saam Tv

Jalgaon Crime News: जळगावमध्ये (Jaogaon) एका तरुणीने भरदिवसा तरुणावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणीने चाकू हल्ला करत तरुणाला जखमी केले. या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही.

Jalgaon Crime
Ajit Pawar News : सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरलेत; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आराेप

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अजिंठा चौकातील ही घटना आहे. एका तरुण आणि तरुणीचा भररस्त्यात गोंधळ सुरु होता. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर संतप्त झालेल्या या तरुणीने पर्समधील छोटा चाकू काढला आणि तरुणावर वार करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत या तरुणीने तरुणाच्या छातीवर वार केले. या चाकू हल्ल्यात तरुण जखमी झाला.

Jalgaon Crime
Nagpur News: मैत्रिणीशी बोलण्यावरुन झाला वाद, तरुणावर तिघांनी केला जीवघेणा हल्ला

चाकू लागल्यामुळे तरुणाच्या छातीतून रक्त येऊ लागले तरी देखील ही तरुणी त्याच्यावर चाकूने वार करत राहिली. यादरम्यान जखमी तरुण या तरुणीच्या हातातला चाकू हिसकावण्याचा प्रयत्न करत करतो. या वादात तरुण आपल्या अंगावरील शर्ट फाडून टाकतो. या तरुणीला थांबवण्यासाठी रस्त्यावर उपस्थित असलेले लोकं विनंती करत असतात तरी सुद्धी ती ऐकत नाही.

भररस्त्यातील तरुण-तरुणींचा हा वाद पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. याप्रकरणाचा तपास जळगाव पोलिस करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com