Aurangabad News : प्रेमविवाहानंतर अवघ्या 3 महिन्यातच तरुणीने संपविलं जीवन; नेमकं काय आहे कारण?

पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणीने अवघ्या 3 महिन्यातच संपविलं जीवन
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

नवनीत तापडिया

Aurangabad Crime News - प्रेमविवाह करुन सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने अवघ्या ३ महिन्यातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल सोमवार (दि.३०) दुपारी २ वाजेच्या सुमारास बजाजनगरात येथे ही घटना उघडकीस आली.

तरुणीच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. घराला हाथबार लागावा त्यामुळे ती एका कोचिंग क्लासेसमध्ये नोकरी करत होती. तिथे तिची एका तरुणाशी मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी घरच्यांचा विरोध होईल म्हणून आळंदी येथे पळून जाऊन लग्न केले.

Aurangabad News
Palghar Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार-बसमध्ये भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

९ नोव्हेंबर २०२२ रोजी या दोघांनी लग्न केले. त्यानंतर काही दिवस पर्यटन करुन दोघेही वाळूज एमआयडीसीत (MIDC) परतले. घरी परतल्यानंतर या नवीन जोडप्याने सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली. मात्र, तीन महिन्यातच दोघांमध्ये वाद सुरु झाले आणि त्यातून तरुणीने टोकाचे पाऊल उचलले.

काही दिवसांपूर्वी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून तरुणीने पती व सासरच्या मंडळी विरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी दोघांसह त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन केले. मात्र, समुपदेशानंतर तरुणी ही सासरी न जाता बजाजनगरात आईकडे गेली होती.

Aurangabad News
Union Budget 2023 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, आज आर्थिक पाहणी अहवालही सादर होणार

दरम्यान, काल सकाळी आई कामासाठी बाहेर गेल्याने तरुणी घरी एकटीच होती. कामाला गेल्यानंतर आई तरुणीच्या मोबाईलवर सतत संपर्क करत होती मात्र तरुणी प्रतिसाद देत नव्हती. अखेर त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी घरात डोकावून पहिले असता तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती उघडकीस आली.

दरम्यान, तरुणीच्या आईने तिला सासरचलचा त्रास असल्याचा आरोप केला आहे तसेच कारवाई करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस (Police) ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com