Nanded Crime : सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; अंगणात थुंकल्यामुळे लहान भावाने होत्याचं नव्हतं केलं

Younger Brother Knife Attack on his Older Brother In Nanded : सतीश तुपसमूद्रे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Younger Brother Murdered By Knife Of his Older Brother In Nanded
Younger Brother Murdered By Knife Of his Older Brother In Nandedसंतोष जोशी

नांदेड: क्रोध हा माणसाच्या हातून काहीही करवून घेऊ शकतो. रागाच्या भरात अनेकदा माणून आपली सदसद्‌बुद्धी गमावतो आणि मग होत्याचं नव्हतं घडतं. अशीच एक भयंकर घटना नांदेडमध्ये (Nanded) घडली आहे. अतिशय शुल्लक कारणातून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रक्ताच्या नात्यानेच एका तरुणाचं आयुष्य संपवलं (Murder) आहे. नांदेडमध्ये अंगणात थुंकल्याच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची निर्घुण हत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. (Younger Brother Attacks Khife on his Older Brother For Spleet His Gagdern)

हे देखील पाहा -

शुल्लक कारणावरुन रक्तातील नातं असलेल्या सख्या लहान भावाने सख्या मोठ्या भावाचाच काटा काढला आहे. आजपर्यंत आपण मालमत्ता, पैश्याचा वाद, शेतीचा वाद, वाटणी आणि अनैतिक संबंध अश्या अनेक कारणांनी भावाने भावाचाच काटा काढल्याचे उदाहरण आहेत मात्र, नांदेडमधील शिवराय नगर येथील लहान भावाने मोठ्या भावाचा खून करण्याचे कारण ऐकुण कुणालाही आश्चर्य वाटेल. केवळ अंगणात थुंकण्याच्या कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लहान भाऊ असलेला सतीश तुपसमूद्रे आणि मोठा भाऊ एकनाथ तुपसमूद्रे यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात सतीशने घरातून भाजी चिरण्याचा चाकू घेऊन एकनाथच्या छातीत रागाच्या भरात वार केले. काही कळण्याच्या आत एकनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि जागीच गतप्राण झाला. आरडाओरड ऐकूण आजूबाजूचे लोकं धावले मात्र, सतीशने घटनास्थळावरुन पलायन केले.

Younger Brother Murdered By Knife Of his Older Brother In Nanded
मोजता-मोजता पोलिसही थकले; एका रिक्षेतून निघाले २७ लोकं! पाहा थक्क करणारा Video

सतीश आणि एकनाथ हे दोघे सख्खे भाऊ शेजारी राहतात. मात्र, एकनाथ याने सतीशच्या अंगणात थुंकल्याच्या शुल्लक कारणाने एकनाथला स्वतःचा जीव गमवावा लागला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी सतीश फरार झाला. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात सतीश तुपसमूद्रे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com