मोठ्या भावाला वाचवताना लहान भाऊ गेला वाहून; लहान भाऊ अद्यापही बेपत्ता...

तापी नदीवरील प्रकाशा घाटावर मुंडन करून आंघोळ करताना मोठ्या भावाचा पाय घसरल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेला लहान भाऊ वाहून गेला आहे.
मोठ्या भावाला वाचवताना लहान भाऊ गेला वाहून; लहान भाऊ अद्यापही बेपत्ता...
मोठ्या भावाला वाचवताना लहान भाऊ गेला वाहून; लहान भाऊ अद्यापही बेपत्ता...दिनू गावित

नंदुरबार: तापी नदीवरील प्रकाशा घाटावर मुंडन करून आंघोळ करताना मोठ्या भावाचा पाय घसरल्याने वाचवण्यासाठी गेलेला लहान भाऊ वाहून गेला आहे. तसेच मच्छीमारांकडून मोठ्या भावाला वाचवण्यात यश आले आहे. (The younger brother was carried away while rescuing the older brother; Little brother still missing...)

हे देखील पहा -

आजोबाच्या दशक्रिया विधीला मुंडन केल्यानंतर तापी नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या मोठ्या भावाचा पाय घसरल्याने वाहुन जात असतांना त्याला वाचविण्यासाठी गेलेला लहान भाऊ पाण्यात वाहुन गेला. दरम्यान मच्छिमारांना मोठ्या भावाला वाचविण्यात यश आले आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील रविन सामुद्रे यांचे वडील मयत झाले होते. वडीलांच्या दशक्रिया विधीसाठी काल नातेवाईकांसमवेत रविन सामुद्रे केदारेश्‍वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या स्मशानभूमीजवळ तापी नदीकिनारी गेले होते. यावेळी रविन सामुद्रे यांचा मोठा मुलगा गौतम सामुद्रे व लहान मुलगा राज सामुद्रे हे दोघेही मुंडन केल्यानंतर आंघोळीसाठी तापीनदी किनारी पाण्यात आंघोळीसाठी उतरले. यावेळी गौतम सामुद्रे याचा अचानक पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या सोबत असलेला लहान भाऊ राज सामुद्रेने गौतमला वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने राज सामुद्रे वाहुन गेला.

मोठ्या भावाला वाचवताना लहान भाऊ गेला वाहून; लहान भाऊ अद्यापही बेपत्ता...
पुण्यात 20 लाख नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित

यावेळी तापी नदीच्या पात्रात मच्छिमारांनी उडी टाकत गौतम सामुद्रे यास पाण्यातुन बाहेर काढत उपचारासाठी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तसेच लहान भाऊ राज सामुद्रे याचा पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो अद्याप मिळुन आलेला नाही.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com