राज्य उत्पादन शुल्क विभागानं पाथर्डी फाट्यावर रचला सापळा पण...

पळून गेलेल्यांचा शोध पोलिसांकडून केला जात आहे.
crime news
crime news saam tv

- तबरेज शेख

Nashik News : चार चाकी गाडीतून (car) दारूची तस्करी करणार्‍या एकास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडलं आहे. दरम्यान अन्य एका वाहनातील संशयित हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. त्यांचा शोध पोलिसांकडून (police) केला जात आहे.

या घटनेाबत अधिक माहिती अशी : दमन निर्मित मध्य गुजरातमार्गे चार चाकी गाडीतमधून छुप्या मार्गाने दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नाशिकच्या (nashik) पाथर्डी फाटा येथे सापळा रचून संशयित चार चाकी येताना दिसल्यावर त्या गाडीला थांबण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी चालक थांबला नाही.

crime news
Rain : काेंडव्यात पावसाचं थैमान; 'या' तारखेपर्यंत सातारा जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा

त्यांनी पथकाला बघून आपली गाडी मुंबई नाक्याच्या दिशेने सुसाट पळवली. पथकाने पाठलाग करत असतांना संशयित गाडी मुंबई नाक्या जवळ दुभाजकावर जाऊन आदळली. या झालेल्या अपघाता नंतर संशयित गाडी चालकाला ताब्यात घेण्यात आले. यात तो किरकोळ जखमी झाला.

त्यानंतर गाडीची तपासणी केली असता गुजरात राज्यातील दारू गाडीत मिळून आली. विशेष म्हणजे गाडीच्या पुढच्या बंपरमध्ये दारूच्या बाटल्या लपुन तसेच गाडीच्या मागची डिकीत छुप्या पद्धतीने दारू ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. मुंबई नाका पोलिसांच्या मदतीने दारू तस्करतील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सोबत असलेले अन्य एक वाहनातील संशयित हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. त्यांचा शोध पोलिसांकडून केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

crime news
Accident : गणपतीचे दर्शन घेऊन गावी परतताना झाला अपघात: एक ठार, एक गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com