Aurangabad: धक्कादायक! जुन्या वादावरून 9 जणांच्या टोळक्याने तरुणाचा चाकू भोसकून केला खून

औरंगाबादमध्ये रविवारी मिसारवाडी परिसरात चाकूने वार करून खून करण्यात आला होता.
Aurangabad: धक्कादायक! जुन्या वादावरून 9 जणांच्या टोळक्याने तरुणाचा चाकू भोसकून केला खून
Aurangabad: धक्कादायक! जुन्या वादावरून 9 जणांच्या टोळक्याने तरुणाचा चाकू भोसकून केला खूनरोहिदास गाडगे

अविनाश कानडजे

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये (aurangabad ) रविवारी मिसारवाडी (Misarwadi) परिसरात चाकूने वार करून खून करण्यात आला होता. त्या खुनाला आता वेगळेच वळण आले असून, २५ चाकूचे वार केल्याचा बदला ३५ वार करून घेतला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी (Fighting)झाली होती. त्यात हसन पटेल यांचा मृत्यू झाला होता. तर या प्रकरणी ९ आरोपींवर सिडको (CIDCO) पोलीस (Police)ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पहा-

या प्रकरणी मुख्य आरोपी तालेब याने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. १० महिन्यांपूर्वी हसन पटेलने माझ्यावर हल्ला करून २५ वार केले होते. त्यानंतर मी २० दिवस रुग्णालयात (hospital) होतो, हे भांडण संपवण्यासाठी आम्ही भेटणार होतो. मात्र, समोर येताच आमच्यामध्ये पुन्हा तुंबळ हाणामारी झाली त्याने पुन्हा माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला आणि हाताला जखम झाली.

Aurangabad: धक्कादायक! जुन्या वादावरून 9 जणांच्या टोळक्याने तरुणाचा चाकू भोसकून केला खून
चिनी सैन्याकडून १७ वर्षीय भारतीय मुलाचे अपहरण; सुटकेकरिता खासदाराने केंद्राकडे केली विनंती

त्यामुळे मी २५ वारांचा बदला म्हणून त्याच्यावर ३५ वेळा वार करून संपवून टाकले, अशी धक्कादायक कबुली विसरवाडीतील मुख्य हल्लेखोर तालेब सुलतान चाऊस याने पोलिसांना (Police) माहिती दिली आहे. गुन्हे शाखेने त्याला काल दौलताबाद (Daulatabad) परिसरातून अटक (Arrested) केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शहरातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा समोर आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com