प्रेयसीचं लग्न ठरलं दुसऱ्या तरुणासोबत; प्रेमप्रकरणाचे फोटो Facebook वर पोस्ट करत युवकाची आत्महत्या

प्रेमप्रकरण यशस्वी न झाल्याने स्वत:च बरंवाईट करुन घेणाऱ्या मुला-मुलींचं प्रमाण वाढत आहे. हवी ती व्यक्ती न भेटल्याने अनेकजण अत्यंत टोकाचा निर्णय घेण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार पाथरी शहरात घडला आहे.
प्रेयसीचं लग्न ठरलं दुसऱ्या तरुणासोबत; प्रेमप्रकरणाचे फोटो Facebook वर पोस्ट करत युवकाची आत्महत्या
प्रेयसीचं लग्न ठरलं दुसऱ्या तरुणासोबत; प्रेमप्रकरणाचे फोटो Facebook वर पोस्ट करत युवकाची आत्महत्याSaamTV

परभणी : आपलं प्रेमप्रकरण यशस्वी न झाल्यानेस्वत:च बरंवाईट करुन घेणाऱ्या मुला - मुलींचं प्रमाण वाढत आहे. हवी ती व्यक्ती न भेटल्याने अनेकजण अत्यंत अत्यंत टोकाचा निर्णय घेण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार पाथरी शहरात (Pathri City) घडला आहे. शहरातील माळीवाडा येथील एक तरुण प्रेम करत असणाऱ्या मुंलीचं लग्न दुसऱ्या तरुणाबरोबर झाल्याने एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by strangulation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अनिल दत्तात्रय चिंचाणे (Anil Dattatraya Chinchane) वय (25 ) असं आत्महत्या केलेल्या युवकाच नावं असून त्याने ITI कॉलेज पाथरी समोरील चौधरी यांच्या मळ्यातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

दोन वर्षापासून होते प्रेमसंबध -

अनिलचे पाथरीतील माळीवाडातील एका तरुणीसोबत गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबध होते. त्यांचे प्रेमप्रकरण घराच्यांना माहीत झाल्यावर घरातील मंडळीनी तरुणीचा विवाह दुसऱ्या तरुणासोबत ठरवला होता. ही माहिती कळल्यावरअनिलने आत्महत्या पूर्वी प्रियसीसोबत असलेले अनेक फोटो फेसबुक (Photos Post On Facebook) वर टाकून आत्महत्या केली.

प्रेयसीचं लग्न ठरलं दुसऱ्या तरुणासोबत; प्रेमप्रकरणाचे फोटो Facebook वर पोस्ट करत युवकाची आत्महत्या
"शिवसेना-भाजप युतीसाठी बोलणी करणार; मात्र मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार"

"मला तुझ्यासारखी नको आहे मला तूच हवी आहे. तसेच मी तुझ्यासोबतचे आणखी फोटो टाकू शकतो.. मात्र माझ्यासाठी तु अधिक प्रिय आहेस, त्यामुळे मी बाकीचे फोटो टाकत नाही" असं देखील अनिलने आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहंल आहे. दरम्यान पाथरी पोलीसांनी (Pathri police) 174 CRPC प्रमाणे गुन्हा दाखल केला असून ते अधिकचा तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com