महागाईविरोधात देऊळगाव राजात युवक काँग्रेसची सायकल रॅली
देऊळगावात इंधन दरवाढीविरोधात निघालेली युवक काँग्रेसची रॅली.

महागाईविरोधात देऊळगाव राजात युवक काँग्रेसची सायकल रॅली

बुलडाणा - इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. महागाईने केव्हाच आसमंत गाठला आहे. दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. केंद्र सरकारच्या हातात महागाईचे नियंत्रण असतानाही त्यांनी कोणतेच नियंत्रण ठेवले नाही. या विरोधात महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते-पदाधिकारी आंदोलन करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठावाडा आणि विदर्भातही आंदोलन तीव्र होताना दिसत आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दरात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे युवक काँग्रेसच्या वतीने शहरातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात होते. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. गॅस सिलिंडर आणि मोटारसायकल लोटगाडीवर ठेऊन शहरातून फिरवण्यात आले.Youth Congress cycle rally at Buldana against Central Government

देऊळगावात इंधन दरवाढीविरोधात निघालेली  युवक काँग्रेसची रॅली.
रायगड जिल्ह्यात तिघांचा बुडून मृत्यू; तर तीन जण गेले वाहून, शोध सुरू

मागील काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या या इंधनाची भरमसाठ दरवाढ केलीय. या दरवाढीमुळे वाहतूक दळण-वळण यंत्रणा प्रभावित झाली आहे. परिणामी सर्वच वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेय. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना जीवन जगणे असह्य झालंय, असा आरोप करीत युवक काँग्रेसने आज देऊळगाव राजा शहरात सायकल रॅली काढली. रॅलीदरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती.Youth Congress cycle rally at Buldana against Central Government

बुलडाणा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे यांनी मोदी सरकारव टीका केली. ते म्हणाले, मोदी यांनी प्रत्येक निवडणुकीत महागाईचा मुद्दा उचलून धरला. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन दिलं होतं. परंतु ते पाळलेलं नाही. इंधनाचे दर केव्हाच शंभरीपार गेले आहेत.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com