Akola Congress : अकोल्यात युवक काँग्रेसचे 'डिग्री चुलीत घाला' आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज युवक काँग्रेसने खुले नाट्यगृह येथे 'डिग्री चुलीत घाला' असे अनोखे आंदोलन केले.
Akola Congress : अकोल्यात युवक काँग्रेसचे 'डिग्री चुलीत घाला' आंदोलन
Akola Congress : अकोल्यात युवक काँग्रेसचे 'डिग्री चुलीत घाला' आंदोलनजयेश गावंडे

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज युवक काँग्रेसने खुले नाट्यगृह येथे 'डिग्री चुलीत घाला' असे अनोखे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पदवीदान कार्यक्रमात घालण्यात येणारा पोशाख घालून हे आंदोलन केले. केंद्रातील भाजप सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेरोजगारांना रोजगार देऊ शकले नाही. गेल्या सात वर्षांमध्ये बेरोजगारीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांनी दिलेले आश्वासन हे खोटे ठरले आहे.

हे देखील पहा :

यामुळे बेरोजगारी सोबतच देशाची आर्थिक व्यवस्था ही ढासळत आहे. परिणामी, केंद्र सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरले असल्यामुळे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश गणगणे यांच्या नेतृत्वामध्ये खुले नाट्यगृह येथे डिग्री चुलीत घाला आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान त्यांनी चूल पेटवून त्यावर चहाची केटली ठेवून प्रतिकात्मक डिग्री चुलीत जाळल्या. तसेच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये नारेबाजी केली.

Akola Congress : अकोल्यात युवक काँग्रेसचे 'डिग्री चुलीत घाला' आंदोलन
कल्याण-मलंग रोडवर पहाटेच्या सुमारास जिवंत अर्भक ठेवून जाणारी महिला CCTV मध्ये कैद!
Akola Congress : अकोल्यात युवक काँग्रेसचे 'डिग्री चुलीत घाला' आंदोलन
Nagpur Breaking : नागपूरच्या लकडगंज परिसरातील Sex Racket चा पर्दाफाश!
Akola Congress : अकोल्यात युवक काँग्रेसचे 'डिग्री चुलीत घाला' आंदोलन
Viral Video | तुम्ही खाताय 'डर्टी टोस्ट! टोस्ट बनताना काय केलं जातंय एकदा पाहाच हा Video

व्यापारी बेरोजगारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील असमतोल यासोबतच आरक्षणाच्या संदर्भातील केंद्र सरकारने केलेली चालढकल या विरोधामध्ये युवक काँग्रेसचे हे आंदोलन होते. या आंदोलनात युवक काँग्रेसचे महासचिव सागर कावरे, शहर अध्यक्ष अंशुमन देशमुख, नगरसेवक पराग कांबळे, आकाश शिरसाट, कपिल रावदेव, फैजल खान, निलेश चतरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.