पार्टीनंतर पाेहणे जिवावर बेतले; धरणात युवक बुडाला, शाेध सुरु

पार्टीनंतर पाेहणे जिवावर बेतले; धरणात युवक बुडाला, शाेध सुरु
drown

सिंधुदुर्ग : सावंतवाडी जवळील माडखोल धरणात पोहण्यासाठी गेलेला एक युवक बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ग्रामस्थांची निदर्शनास आली आहे. रेस्क्यू टीमच्या सहाय्याने युवकाचा शोध घेतला जात आहे. हा युवक खासकीलवाडा परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. sindhudurg sawantwadi youth drown in madkhol dam

drown
सभेला येताना दोन वेळचा डबा आणा; पालकमंत्र्यांना राणेंचा सल्ला

माडखोल धरणावर पार्टी करण्यासाठी तीन युवक बुधवारी गेले होते. त्यातील एक जण माडखोल तर दोघे शहरातील खासकीलवाडा परिसरात वास्तळ्यास आहेत. पार्टी झाल्यानंतर धरण परिसरात पोहण्यासाठी युवक गेले. एकास पोहायला येत नव्हते तरी ताे पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबतची माहिती अन्य दाेघांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युवकाची शाेधा शाेध सुरु केली. परंतु अंधार पडल्याने शाेध माेहिम थांबली. आज (गुरुवार) युवकाचा सकाळी रेस्क्यू टीमच्या सहाय्याने शोध सुरु झालेला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com