Mohol: तरण्याबांड शेतकऱ्याच्या आत्महत्येने मोहोळ परिसर हळहळला

मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Suicide
SuicideSaam tv

सोलापूर : शेतीसाठी खूप खर्च करूनही कोणतेच उत्पन्न मिळत नसल्याने निराश हाेऊन सोलापूर (solapur) जिल्ह्यातील मोहोळ (mohol) येथील एका २८ वर्षीय युवा (youth) शेतकऱ्याने (farmer) झाडास गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. मनोज राजाराम गायकवाड (manoj rajaram gaikwad) असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. (mohol latest marathi news)

मनोज हा मोहोळ येथील गायकवाड वस्तीत आजी आणि वडिलांसोबत वास्तव्यास होता. त्यांचे पाऊण एकर शेत आहे. त्या शेतात खर्च करूनही त्याला उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे तो आर्थिक तणावात असायचा अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Suicide
Solapur: बार्शीतील २ सराफांसह ७ अटकेत, ६ जणांचा शाेधू सुरु : तेजस्वी सातपुते

दरम्यान मनाेजने नैराश्येतून शेतातील (farm) लिंबाच्या झाडाला (tree) टॉवेल बांधत गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Suicide
Satara: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शिखर शिंगणापूर यात्रेस ग्रीन सिग्नल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com