नदीत वाहून गेल्याने वसमत येथील तरुणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत येथील रेल्वे स्टेशन भागातील गंगाजीबापू मंदिर येथे राहणाऱ्या निलेश गणेश बच्चेवार (वय २९) दर रविवारी श्री स्वामी समर्थांच्या आरतीसाठी अकोली येथे जात होता.
नदीत वाहून गेल्याने वसमत येथील तरुणांचा मृत्यू
निलेश बच्चेवार नदीत वाहून गेल्याने मृत्यू

संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील अकोली येथील मंदिरात आरती करुन परत वसमतकडे येत असताना दुचाकीसह नदीत वाहून गेल्याने वसमत येथील तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ११ ) रात्री आठच्या सुमारास घडली. दरम्यान, सोमवारी (ता. १२) सकाळी ग्रामीण पोलिसांनी शोध घेतला असता घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत येथील रेल्वे स्टेशन भागातील गंगाजीबापू मंदिर येथे राहणाऱ्या निलेश गणेश बच्चेवार (वय २९) दर रविवारी श्री स्वामी समर्थांच्या आरतीसाठी अकोली येथे जात होता. नेहमीप्रमाणे आरतीसाठी गेल्यानंतर आरती करुन रात्री आठच्या सुमारास निलेश दुचाकीवर रोडगामार्गे वसमतकडे निघाला होता. तत्पूर्वी दुपारी तीन वाजल्यापासून तालुक्यासह सर्वत्र सारखा तीन तास मुसळधार पाऊस झाला होता. दरम्यान मोठ्या पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पुर आले होते. त्याचप्रमाणे अकोली येथून रोडगा मार्गे जाणाऱ्या छोट्या नदीला पुर येऊन पुलावरुन पाणी वाहू लागले होते.

हेही वाचा - अतिक्रमण केलेल्या सरपंच आणि सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र

अशा परिस्थितीतही गणेश याने आपली दुचाकी पुलावर घालून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्याने गणेश दुचाकीसह पुरात वाहुन गेला. रात्री सर्वत्र अंधार असल्याने गावातील नागरीकांनी बॅटरीचा वापर करुन शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू अंधार व वाहणाऱ्या पाण्याचा वेग यामुळे काही शोध लागला नाही. सोमवारी घटनेची ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, हवालदार संजय गोरे व अंबादास विभूते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुलापासून १५ मिटरवर दुचाकी व एक किलोमीटर अंतरावर गणेशाचा मृतदेह सापडला. मृतदेहावर शासकिय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com