महादेव खोरी परिसरात युवकाचा निर्घृण खून; पाेलिसांचे पथक रवाना
Crime News

महादेव खोरी परिसरात युवकाचा निर्घृण खून; पाेलिसांचे पथक रवाना

अमरावती : अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरात एका युवकाचा बुधवारी सायंकाळच्या सुमारास खून झाला आहे. प्रणय मधुकर सातनूरकर असे मृत युवकाचे नाव आहे. या खूनाच्या तपासासाठी फ्रेजरपुरा पोलिसांची दोन पथके संशयितांच्या शोधात रवाना करण्यात आली आहे. (youth-killed-in-amravati-crime-news-sml80)

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आज (गुरुवार) सकाळपासून पाेलिस संशियतांचा कसून तपास करीत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी : प्रणय सातनूरकर हा महादेव खोरी परिसरात रहायचा. ताे सुतार काम करीत होता. त्याचा काही युवकांसोबत जुना वाद होता. बुधवारी सायंकाळच्या सुमारास तो महादेव खोरी येथून जात असताना पाच जणांनी त्याला अडविले.

जुन्या वादावरून त्याच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविण्यात आला. प्रणय याच्या मानेवर गंभीर वार करण्यात आले. धारदार शस्त्रांनी हल्ला चढविल्यानंतर पाचही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

Crime News
देवा सारखं धावून आलात भाऊ! पूरातून 17 जणांचा वाचला जीव

दरम्यान माेठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रणयचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरविली Crime News आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com