विद्युत पुरवठा यंत्रणा सुधारावी यासाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा लढा

१९८२ साली उभारलेल्या यंत्रणेत अद्याप सुधारणा नाही; उजेड देणारी यंत्रणा जीवावर बेतण्याची स्थानिकांना भीती
Raigad News
Raigad News सुमित सावंत

रायगड - कर्जत तालुक्यात असलेल्या पाषाणे ते कळंब या ४ ग्रुप ग्रामपंचायतिच्या परिसरात सातत्याने विज पुरवठा खंडित होत असून, तक्रार करुनही अद्याप कुठलीही उपाययोजना नाही, म्हणून त्वरित लक्ष घालून उपाययोजना शासनाने करावी अशी मागणी करणारं पत्र युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उत्तम पालांडे (Uttam Palande)यांनी थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) आणि विद्युत पुरवठा मंत्री नितीन राऊत (Nitina Raut) यांनी दिलं आहे. (Raigad Latest News)

रायगड (Raigad) जिल्हाच्या उत्तरेस, कर्जत तालुक्यातील पाषाणे ते कळंब व पोशीर गावांच्या परिसरात एकूण ४ ग्रुपग्रामपंचायती आहेत. या ४ ग्रुप ग्रामपंचायतीत एकूण ८ ते ९ हजारावर घरं आहेत. जिथे ४० ते ५० हजारावर लोकवस्ती असलेली गावे आहेत. या गावामध्ये गेल्या काही वर्षात विकासकामं जोरदार सुरू असून बरीच गावं शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पण विकासकामे होऊनही वर्षानुवर्षे सुरू असलेला विजेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

हे देखील पहा -

या ग्रुप ग्रामपंचायतींच्या हद्दीत वीज वारंवार खंडित होणे, जिल्ह्यातील इतर भागापेक्षा अधिक भारनियमन लागू करणे, पावसाळ्यात विजेचे पोल कोसळून काही दिवसांसाठी वीज पूर्णतः खंडित होणे, विज गेली की पुन्हा कधी येईल याबाबत कुठलाही संदेश मोबाईल वर येत नाही, विजेचे पोल रस्ताच्या बाजूला झुकलेले आहेत.

त्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ शकते ,जर योग्य वेळी लक्ष घातले नाही तर, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही .विजेच्या वारंवार खंडित होण्यामुळे आणि भारनियमन लागू केल्यामुळे परिसरातील नागरिक/ग्रामस्थ बेजार झाले आहेत. यावर ठोस उपाययोजना आता सर्व गावातील ग्रामस्थांना अपेक्षित आहेत.

Raigad News
Beed: कोरोना नियमांना हरताळ फासत शाही पार्टीचे आयोजन

१९८२ सालीची वीज यंत्रणा अद्याप बदलली नाही

या परिसरात १९८२ साली विज येऊन पहिला दिवा पेटला होता. पण तेव्हा गावांमध्ये वीज पोहचवण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेच्या श्रेणीत सुधारणा त्यानंतर अद्याप हवी तशी झालेली नाही . गावांमध्ये लोकसंख्या वाढू लागली आहे, विकास कामं होत असल्यामुळे ५-७ मजली इमारती उभ्या राहून गावांच शहरात रूपांतर होतं आहे. पण विजेची यंत्रणा मात्र आहे त्याच स्थितीत स्थिरावलीय. ती आता श्रेणी सुधारित करण्याची गरज आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com