माजी आमदार गणपतराव देशमुखांवर शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा

माजी आमदार गणपतराव देशमुखांवर शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा
Ganpatrao Deshmukh

पंढरपूर : सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते‌ व माजी आमदार गणपतराव देशमुख Ganpatrao Deshmukh ‌यांची प्रकृती ठणठणीत व्हावी यासाठी सांगाेला तालुक्यातील युवकांनी नुकतेच महादेवास साकडे घातले. दरम्यान माजी आमदार देशमुख यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याची माहिती त्यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख यांनी दिली. (youth-performed-pooja-ganpatrao-deshmukh-sangola-sml80)

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे. ते खूप दिवसांपासून आजारी हाेते. त्यांची प्रकृती उत्तम व्हावी यासाठी सांगोला तालुक्यातल्या युवकांनी शिवलिंगाला दुग्धाभिषेक करून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना तसेच त्यांचा आरोग्य उत्तम राहावं यासाठी प्रार्थना केली.

Ganpatrao Deshmukh
रेणके आयाेगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणकेंची प्रकृती स्थिर

धायटी गावचे सरपंच रवी मेटकरी तसेच त्यांच्या मित्र परिवाराने सांगोला तालुक्यातल्या सावे गावातील सावलेश्वर मंदिरात जाऊन स्वयंभू शिवपिंडीवर दुग्धाभिषेक केला. ज्येष्ठ नेते मार्गदर्शक गणपतराव देशमुख यांच्या उत्तम आरोग्यासाठी साकडे घातल्याचे युवकांनी सांगितले.

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम आहे. सांगोला तालुक्याचे आमदार म्हणून ते कार्यरत हाेते. वयोमानानुसार त्यांनी सन 2019 साली विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाल्याची माहिती त्यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com