सातारा : न्यायासाठी शेरेवाडीतील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने युवकाचा जीव वाचला.
सातारा : न्यायासाठी शेरेवाडीतील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
youth protest in satara

सातारा : न्याय मिळत नसल्याने सातारा जिल्ह्यातील एका युवकाने आज (गुरुवार) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आत्मदहन करण्याचा मार्ग अवलिंबला. सातारा (satara) पाेलिसांनी प्रसंगावधान राखल्याने युवकाचा जीव वाचला. दरम्यान युवकाने मला न्याय मिळत नसल्याने मी आत्मदहनाच्या निर्णयापर्यंत आल्याचे माध्यमांशी बाेलताना सांगितले.

youth protest in satara
DCC त उदयनराजे सुटले; सहकारमंत्र्यांपुढे उंडाळकरांचे आव्हान

शेरेवाडी तालुका सातारा येथील सचिन स्वामी याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तंटामुक्ती अध्यक्ष तसेच माने कुटुबियांच्या अन्याला कंटाळून आत्मदहनाचा करीत असल्याचे त्याने नमूद केले. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सचिनचा जीव वाचला.

पाेलिसांनी सचिन स्वामी यास जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर नेले. तेथे पालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या कर्मचा-यांना बाेलाविण्यात आले. तेथे सचिन यांच्या अंगावर पाणी फवारण्यात आले. त्यानंतर त्यास रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com