खड्यातील पाण्यात उतरून युवा सेनेचे आंदोलन
खड्यातील पाण्यात उतरून युवा सेनेचे आंदोलनभारत नागणे

खड्यातील पाण्यात उतरून युवा सेनेचे आंदोलन

माळशिरस ‌तालुक्यातील संगम येथे रस्त्यावर असे अनेक खड्डे आहेत.‌या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.

पंढरपूर: अकलूज- टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी संगम येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उतरून युवा सेनेने आंदोलन केले. मागील अनेक दिवसांपासून अकलूज ते टेंभूर्णी दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू‌ असून ते अपूर्ण आहे.

माळशिरस ‌तालुक्यातील संगम येथे रस्त्यावर असे अनेक खड्डे आहेत.‌या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. वाहन चालकांना आपला‌ जीव टांगणिला लाऊन ‌प्रवास करावा‌‌ लागत आहे. येथे अनेक अपघात झाले आहेत.‌ तरीही रस्ता दुरुस्ती‌कडे बांधकाम कंपनीचे दुर्लक्ष आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे आणि बांधकाम कंपनीचे लक्ष वेधून घेण्यासाठी माळशिरस तालुका युवा सेना प्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली खड्यातील पाण्यात उतरून‌आंदोलन केले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com