Sharad Pawar: शेतीवरील भार वाढतोय; युवकांना अन्य क्षेत्राकडे वळावं लागणार - शरद पवार

'स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 35 कोटी लोकसंख्या 70 टक्के शेतीवर अवलंबून होती. आता 115 कोटी लोकसंख्या 58 टक्के शेतीवर अवलंबून आहे.'
Sharad Pawar: शेतीवरील भार वाढतोय; युवकांना अन्य क्षेत्राकडे वळावं लागणार - शरद पवार
Sharad Pawar: शेतीवरील भार वाढतोय; युवकांना अन्य क्षेत्राकडे वळावं लागणार - शरद पवारSaam TV

बारामती : स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 35 कोटी लोकसंख्या 70 टक्के शेतीवर अवलंबून होती. आता 115 कोटी लोकसंख्या 58 टक्के शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीवरील भार वाढतोय आणि शेतजमिनी अधिग्रहीत होते आहेत. हा बोजा कमी करण्यासाठी युवकांना वेगळ्या क्षेत्राकडे वळावे लागणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केलं आहे.

ते बारामतीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर केलेल्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन अँग्रीकल्चर फेलोज यांच्या 21 दिवसीय प्रशिक्षण शिबीराचा समारोप आज बारामतीत (Baramati) झाला. यावेळी शरद पवार बोलत होते.

Sharad Pawar: शेतीवरील भार वाढतोय; युवकांना अन्य क्षेत्राकडे वळावं लागणार - शरद पवार
Shivsena : 'आपण कारणं शोधत असतो;' शंभुराज देसाईंच्या पराभवावरती परबांचं वक्तव्य

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, विश्वस्त सुनंदा पवार आदी उपस्थित होते.

कृषी, साहित्य व शिक्षण या तीन क्षेत्रात शरद पवार इन्स्पायर फेलोशिपची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. यातील कृषी क्षेत्रात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक मुलगा व एक मुलगी या नुसार 80 जणांची निवड करण्यात आली होती. या 80 जणांना उद्योजकीय मानसिकता तयार व्हावी व प्रोत्साहन मिळावे या साठी 21 दिवसांचे प्रशिक्षण बारामतीच्या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटरमध्ये दिले गेले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com