
- नवनीत तापडिया
Aurangabad News : राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित विद्यार्थीनी चंद्रपुर जिल्ह्यातील आहे. या घटनेचा तपास सातारा पाेलिस (police) करीत आहेत. (Breaking Marathi News)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्ती बुजाडे (yuvkti bujade) ही चार वर्षांपूर्वी विधी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला (aurangabad) आली होती. सध्या ती अंतिम वर्षाला होती. तीन महिन्यानंतर तिची परीक्षा असल्यामुळे त्याची ती तयारी करीत होती. मंगळवारी सकाळी ती विद्यापीठात गेली.
वर्गात हजेरी लावल्यानंतर वसतिगृहातील रुमवर परतली. रूममध्ये मित्रासोबत फोनवर बोलत असल्यामुळे रूममेट खोलीबाहेर गेली. काही वेळाने परत आल्यानंतरही तिला खोलीतून बोलण्याचा आवाज आला. त्यामुळे ती परत निघून गेली.
परंतु, अर्ध्यातासाने परत आल्यावर तिला आतून आवाज येत नव्हता आणि दरवाजा वाजविल्यानंतर प्रतिसादही मिळत नव्हता. तेव्हा तिने याविषयीची माहिती वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा युक्ती बेशुध्द अवस्थेत आढळली. तिला एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी (doctor) तपासून तिला मृत घोषीत केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.