वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात युवा सेनेने सोडला साप

लोडशेडिंग नसतांना वेळी - अवेळी वीज जाते, त्यामुळे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी कंपनीच्या कार्यालयात साप सोडल्यामुळे अधिकाऱ्यांत प्रचंड धावपळ सुरू झाली.
वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात युवा सेनेने सोडला साप
वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात युवा सेनेने सोडला सापअरुण जोशी

अमरावती - नांदगाव शहरासह nandgoan city तालुक्यातील ग्रामीण भागातील rural area गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव unstable electricity supply सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. लोडशेडिंग load shading नसतांना वेळी - अवेळी वीज जाते, त्यामुळे अचानक युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी कंपनीच्या कार्यालयात साप सोडल्यामुळे अधिकाऱ्यांत प्रचंड धावपळ सुरू झाली. Yuva Sena released a snake at the office of the power distribution company

हे देखील पहा -

स्थानिक वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात युवा सेनेने अचानक साप सोडो आंदोलन केले. सतत वीजेचा लपंडाव सुरू असून उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे यांना तक्रारी देऊन सुद्धा विजेचा खेळखंडोबा थांबला नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून बहुतांश भागात व्होलटेज नसल्यामुळे नगरपंचायत व ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. स्ट्रीट लाईट बंद पडले, त्यामुळे पावसाळ्याचे दिवस असून दररोज साप निघत आहे. म्हणून वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे एक महिन्यापासून नागरिक त्रस्त आहेत.

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात युवा सेनेने सोडला साप
धक्कादायक; कोल्हापूर तलावात पाच तरुण बुडाले

स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील एक्सरे मशीन व इतर यंत्रे व्होलटेज अभावी निकामी झाले आहे. अनेक सोयी सुविधा मिळत नाही. त्यामुळे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी कंपनीच्या कार्यालयात साप सोडो आंदोलन केले व सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. यावेळी सरपंच गोकुळ राठोड, सूरज औतकर, निखिल मोरे, निलेश निंबरते, पवन ठाकरे, अक्षय राणे, अजय काळे, धनंजय भडके, आशिष हटवार, पंकज रामगावकर, पवन पुसदकर,अक्षय तुपट, आशिष भाकरे, पवन मोकडेकर, अभय बनारसे, शुभम रावेकर, अमन मानकर, रोशन भातुलकर, विक्की बविस्थळे, सागर गटूले, तेजस जवळकर, श्याम मुळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com