भावासाठी बहिणीने मारली धरणात उडी, पण चिमुकल्यांवर काळाने घातला घाला

अकोला जिल्ह्यातील आकोट तालूक्यात डांगरखेडा येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे.
भावासाठी बहिणीने मारली धरणात उडी, पण चिमुकल्यांवर काळाने घातला घाला
dam saam tv

अकोला : जिल्ह्यातील आकोट (Akot) तालूक्यात डांगरखेडा येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. डांगरखेडा या आदीवासी बहुल गावातील सख्ख्या बहिण-भावाचा चिचपानी (brother-sister death) धरणात बुडून मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी गेलेल्या दोघा चिमुकल्यांवर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. युवराज केशव बेलसरे (९) आणि प्रतीक्षा केशव बेलसरे (११) अशी मृतांची नावं आहेत. दोन्ही मुलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांचे वडील केशव बेलसरे यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

dam
चिंता वाढली! राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय; वाचा आजची आकडेवारी

मिळालेल्या माहितीनुसार, डांगरखेड येथिल आदीवासी केशव बेलसरे हे घरी नसताना त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा युवराज आणि अकरा वर्षीय मुलगी प्रतीक्षा हे दोघे (Swimming in Dam) शेजारच्या मुलीसोबत धरणावर पोहायला गेले होते. त्यावेळी युवराज धरणाच्या पाण्यात पोहायला गेला. त्याचदरम्यान त्याची बहिण प्रतीक्षा आणि तिची मैत्रिण पाण्याबाहेर होती. युवराज धरणात पोहत असताना पाण्यात बुडत असल्याचे प्रतीक्षाने पाहिलं.

dam
मुंबईत कोरोना फोफावतोय! नव्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ, नागरिक चिंताग्रस्त

त्यानंतर प्रतीक्षाने युवराजवा वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, दोघांनाही पाण्याचा प्रवाहाचा अंदाज येत नसल्याने बाहेर पडता येत नव्हते. ही सर्व घटना प्रतीक्षाच्या मैत्रिणीने पाहिल्यावर तिने गावात धाव घेतली. पण ग्रामस्थांची मदत मिळेपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे या चिमुकल्या बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, रिसरातील एकलव्य बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, या घटनेबाबत आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला कळण्यात आले आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com