Shivrajyabhishek Din : तोपर्यंत मी गडउतार होणार नाही : युवराज संभाजीराजे छत्रपती (पाहा व्हिडिओ)

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेत जिल्हा प्रशासनासमवेत बैठक घेतली.
raigad fort, raigad, Shivrajyabhishek Din, yuvraj sambhajiraje chhatrapati
raigad fort, raigad, Shivrajyabhishek Din, yuvraj sambhajiraje chhatrapatisaam tv

- सचिन कदम

Raigad News : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज तारखेनूसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक साेहळा (350th Shivrajyabhishek Sohala) माेठ्या उत्साहात साजरा होत आहे. किल्ले रायगडाच्या (raigad) इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज पहावयास मिळाली. किल्ले रायगडवर एक लाखापेक्षा अधिक शिवभक्त दाखल झाले आहेत. तितकीच गर्दी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी झाल्याने मध्य रात्री शिवप्रेमींसाठी गडावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. (Maharashtra News)

raigad fort, raigad, Shivrajyabhishek Din, yuvraj sambhajiraje chhatrapati
VishalGad News : शिवप्रेमींनाे ! विशाळगडाबाबत पुरातत्त्व विभागानं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या

दरम्यान किल्ले रायगड येथे प्रवेश बंद केल्यानंतर शिवप्रेमी नाराज झाले आहेत. तसेच रस्त्यावरील परीस्थिती पाहिली तर माणगाव आणि महाडच्या दोन्ही रस्त्यांवर वाहनांच्या भल्या माेठ्या रांगा लागल्या आहेत. या परिस्थितीमुळे येथे आलेल्या शिवप्रेमींचा हिरमोड हाेऊ लागला आहे.

किल्ले रायगडकडे जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे ठप्प झाली हाेती. महाड ते रायगड रोड वर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. ढालघर मार्गे देखील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवली गेली. अनेक शिवप्रेमींची वाहने परतीच्या मार्गावर गेली. त्यामुळे आजच्या सोहळ्यास उपस्थित राहता येत नसल्याने शिवप्रेमींत नाराजीचा सूर पसरला.

raigad fort, raigad, Shivrajyabhishek Din, yuvraj sambhajiraje chhatrapati
SSC Result 2023 : संसाराचा गाडा हाकत सख्या बहिणींनी दहावीची परिक्षा दिली, निकाल हाती येताच मोरे भगिनींचे डाेळे पाणावले

या सर्व घडमाेडी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या कानावर पडल्या. त्यानंतर शिवप्रेमींना किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेता यावे त्यांना अभिवादन करता यावे यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेत जिल्हा प्रशासनासमवेत बैठक घेतली.

या बैठकीनंतर संभाजीराजेंनी एक ट्विट करत शिवप्रेमींनी गड चढण्याची गडबड करुन नये असे आवाहन केले. संभाजीराजे लिहितात दुर्गराज रायगड वर सध्या जवळपास अडीच लाख लोक उपस्थित असून गडाच्या खाली जवळपास ५० - ७५ हजार लोक आलेले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये. जिल्हा व पोलीस प्रशासन सोबत बैठक झालेली आहे.

सध्या गडावर असलेले लोक ९ - १० च्या दरम्यान गड उतरतील, तेव्हा शिस्तबद्ध रीतीने खाली असलेल्या लोकांना वरती सोडले जाईल. सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गडउतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो. कृपया सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन संभाजीराजेंनी शिवप्रेमींना केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com