झोटिंग समितीचा अहवाल सापडला..!

एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी भाजप सरकारच्या काळात नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल अखेर सापडला आहे.
झोटिंग समितीचा अहवाल सापडला..!
झोटिंग समितीचा अहवाल सापडला..!SaamTv

मुंबई : एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी भाजप सरकारच्या काळात नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल अखेर सापडला आहे. आज सकाळी हा अहवाल गहाळ झाल्याची माहिती पुढे आली होती. Zoting committee report found..!

हे देखील पहा -

मात्र हा अहवाल मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या कार्यलयातच असल्याचे समोर आले आहे. भाजप सरकार मध्ये झोटिंग समितीचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला होता. या समिती अहवालात एकनाथ खडसे यांनी क्लिनचिट देण्यात आली होती. एकनाथ खडसे यांची जमीन गैरव्यवहार प्रकारणी ईडी कडून चौकशी सुरू असतांना अचानक राज्य सरकारकडे सादर झालेला झोटिंग अहवाल गहाळ झाल्याचे समोर आले होते.

झोटिंग समितीचा अहवाल सापडला..!
ईडीची सूडबुद्धीने कारवाई ; एकनाथ खडसे

यानंतर एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तर यावरून सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये आरोप प्रत्यारोप ही सुरू झाले. मात्र, याच दरम्यान हा अहवाल सापडल्या नंतर आता राज्याचे मुख्य सचिव मुख्यमंत्री यांना हा अहवाल सादर करणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com