महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूू ... एका क्लिकवर...

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूू ... एका क्लिकवर...

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे.  महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक 1 हजारहून जास्त कोरोना रुग्ण आढळून आलेत. गेल्या 24 तासांत 1 हजार 8 नव्या रुग्णांचं निदान झालंय. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 506 वर पोहचली आहे. तर मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 7 हजार 812वर पोहोचलीय.
राज्यात शुक्रवारी 26 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला...तर कोरोनावरील यशस्वी उपचारानंतर 106 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला...राज्यात आतापर्यंत 1 हजार 879 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ५३ हजार १२५ नमुन्यांपैकी १ लाख ४० हजार ५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११ हजार ५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ४८५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्ग मधील १, भिवंडी महानगरपालिकेतील १, ठाणे मनपामधील १, नांदेड मधील १,औरंगाबाद मनपामधील १ तर १ मृत्यू परभणी येथील आहे. या शिवाय उत्तर  प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १८ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर ११  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे.  
या २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये (५८  टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत

राज्याच्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या
मुंबई महानगरपालिका: ७८१२ (२९५)
ठाणे: ५१ (२) 
ठाणे मनपा: ४३८ (७)
नवी मुंबई मनपा: १९३ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १७९ (३)
उल्हासनगर मनपा: ३
भिवंडी निजामपूर मनपा: १७ (१)
मीरा भाईंदर मनपा: १३५ (२)
पालघर: ४४ (१)
वसई विरार मनपा: १३५ (३)
रायगड: २६ (१)
पनवेल मनपा: ४८ (२)
*ठाणे मंडळ एकूण: ९०८ (३२०)*
नाशिक: ६
नाशिक मनपा: ३५
मालेगाव मनपा:  २०१ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८(२)
धुळे मनपा: १८ (१)
जळगाव: ३४ (११)
जळगाव मनपा: १० (१)
नंदूरबार: ११ (१)
*नाशिक मंडळ एकूण: ३६५ (३०)

सांगली: २९
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: २ (१)
रत्नागिरी: ८ (१)
*कोल्हापूर मंडळ एकूण: ५५ (३)*
औरंगाबाद:२
औरंगाबाद मनपा: १५९ (८)
जालना: ३
हिंगोली: २२
परभणी: १ (१)
परभणी मनपा: २
*औरंगाबाद मंडळ एकूण: १८९ (९)*
लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३ 
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ४
*लातूर मंडळ एकूण: २० (२)*
अकोला: १२ (१)
अकोला मनपा: २७
अमरावती: २
अमरावती मनपा: २६ (७)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २
*अकोला मंडळ एकूण: १६९ (९)*
नागपूर: ६
नागपूर मनपा: १३३ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: १४४ (२)*
पुणे:६८ (४)
पुणे मनपा: ११७६ (९२)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: १०१ (६)
सातारा: ३२ (२)
*पुणे मंडळ एकूण: १४५६ (१०७)*
कोल्हापूर: ९
कोल्हापूर मनपा: ६
इतर राज्ये: २७ (३)
*एकूण:  ११,५०६  (४८५)*
*(टीप ही माहिती कोरोना पोर्टलवरील आयसीएमआरने दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७९२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ८४९ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ४५.३४ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com