महाराष्ट्राची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने? वाचा सध्याचे राज्यातील अपडेट्स

साम टीव्ही
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत, म्हणूनच सरकार आणि प्रशासन सतर्क झालंय. त्यामुळेच, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध घातले गेलेत पाहूयात, महाराष्ट्रात कुठं आणि कोणते निर्बंध घालण्यात आलेयत . 

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढत आहेत, म्हणूनच सरकार आणि प्रशासन सतर्क झालंय. त्यामुळेच, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध घातले गेलेत पाहूयात, महाराष्ट्रात कुठं आणि कोणते निर्बंध घालण्यात आलेयत

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचे आकडे वाढता वाढत वाढत चाललेयत. दरदिवशी शेकडो संख्येनं कोरोनाग्रस्तांची नव्याने भर पडतीय, मृतांचा आकडा तितकासा गंभीर नसला तरी, कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती नाकारता येत नाही. महत्त्वाचं म्हणजे, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचे वाढते आकडे चिंतेत भर टाकणारेआहेत. म्हणूनच अनेक जिल्ह्यांमध्ये आणि गर्दी होण्याच्या ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आलेयत.

पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुण्यातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आलेयत. तर अनेक भाग मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेयत. त्याचप्रमाणे, विवाह सोहळे आणि इतर कार्यक्रमांमध्ये केवळ 200 जणांचीच उपस्थिती बंधनकारक करण्यात आलीय. पुणे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.

नाशिकमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंडही आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, आठ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर आणखी कडक निर्णय घेण्यात येणार आहेत.

नागपुरातील आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद तर मुख्य बाजारपेठा शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे, 7 मार्चपर्यंत मंगल कार्यालयं, सर्व शाळा, महाविद्यालयं आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. नागपुरातील हॉटेल, रेस्टोरंटही 50 टक्के क्षमतेनेच चालवण्याची परवानगी देण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे, रात्री 9 नंतर हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आलेयत. त्याचसोबत, सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्चपर्यंत बंद राहतील. तसेच, 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीतच, तेही घरच्या घरी लग्नसोहळे करता येणारेत.

नांदेड शहरात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.

अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यांत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व प्रकारची दुकाने  फक्त सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच सुरू राहतील. तसेच, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेलाच परवानगी देण्यात आलीय. लग्नसोहळ्यांमध्ये फक्त 25 व्यक्तींनाच उपस्थित राहता येणारेय.बसमध्येही क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांनाच प्रवेश मिळणारेय. त्याचप्रमाणे,  शाळा, महाविद्यालयं आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आली आहेत. सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने आणि नाट्यगृहही बंद ठेवण्यात आलीयत.

बुलडाण्यातील शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर बंद ठेवण्यात येणार असून, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर बुधवार सकाळपर्यंत बंद ठेवण्यात आलंय त्याचप्रमाणे, पंढरपूर शहरात संचारबंदी लागू केल्यामुळे कोणत्याच भक्ताला पंढरपुरात प्रवेश मिळणार नाहीय.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live