महाविकास आघाडीमध्ये बिघाडी! यशोमती ठाकुरांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा

साम टीव्ही
शनिवार, 5 डिसेंबर 2020

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे,

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे, राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याचं बोललं जात असतानाच, काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत, महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिलाय.

एका मुलाखतीत शरद पवार यांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवारांनी राहुल गांधींच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला होता. या सर्व वातावरणामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या सगळ्या धुसफुसीमुळे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल. 

यशोमती ठाकुर यांनी काय ट्विट केलंय पाहा -

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live