महाविकास आघाडीमध्ये पुन्हा कुरघोडी, अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांच्या कामावर नाराजी

साम टीव्ही
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा कुरघोडी असल्याचं समोर आलंय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा कुरघोडी असल्याचं समोर आलंय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा कुरघोडी असल्याचं समोर आलंय. खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी परभणीच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलीय. महाविकास आघाडीच्य सरकारमध्ये काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही अशाप्रकारे अशोक चव्हाणांनी तक्रार मांडली. त्यामुळे महाविकास आघाडीतली धुसफूस चव्हाट्यावर आलीय.

पाहा व्हिडिओ -

यापूर्वीही अनेकदा महाविकास आघाडीतील नाराजी समोर आलीय. आता अशोक चव्हाणांच्या रुपानं ही धुसफूस पुन्हा समोर आलीय. दुसरीकडे विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून हे दबावतंत्र असल्याचीही चर्चा रंगलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live