शिवसेनेला व्हायचंय मुंबईचा कारभारी, मात्र यावरुन आघाडीत बिघाडी, वाचा काय घडलं?

साम टीव्ही
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021
  • शिवसेनेला व्हायचंय मुंबईचा कारभारी
  • मुंबईसाठी एकाच प्राधिकरणाची मागणी
  • मुंबईच्या प्राधिकरणावरुन महाविकास आघाडीत बिघाडी

मुंबईत अनेक शासकीय यंत्रणा आणि प्राधिकरणं एकत्र काम करतायत. शिवसेनेला मात्र मुंबईचा सगळा कारभार महापालिकेच्या हाती हवाय. पण शिवसेनेच्या मागणीला काँग्रेस राष्ट्रवादीचा मात्र विरोध आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी मुंबईत एकाच वेळी अनेक सरकारी यंत्रणा काम करतायत. म्हाडा, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, बीपीटी अशा यंत्रणांकडून मुंबईत विकासकामं केली जाताय. या सगळ्या यंत्रणा वेगवेगळ्या असल्यानं समन्वय राहत नसल्याचा शिवसेनेचा दावा आहे. त्यामुळं मुंबईसाठी एकच प्राधिकरण नेमण्याची मागणी शिवसेनेनं राज्य सरकारकडं केलीय.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची नियुक्ती, काँग्रेसला राज्यातील नंबर 1 चा पक्ष बनवण्याचा निर्धार

शिवसेनेच्या या मागणीला काँग्रेसनं विरोध केलाय. महापालिकेच्या हाती सर्वसत्ता देणं योग्य नसल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.

राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या मागणीवर सावध भूमिका घेतली असून प्राधिकरणं असतातच असं ठासून सांगितलंय.

शिवसेनेला मुंबईची सर्वंकष सत्ता हवीये. पण राज्यात जे पक्ष सत्तेतील भागीदार आहेत त्यांनी मुंबईत शिवसेनेच्या या भूमिकेला विरोध केलाय. या विरोधाच्या भूमिकेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live